TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नीचा डाव फसला! लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं
पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या जाळ्यात अडकलेल्या तुकाराम सुपेंनी मोठी माया कमावल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पहिल्या धाडीत तब्बल 90 लाख रुपये जप्त केल्यानंतर पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा तुकाराम सुपे आणि त्यांच्या मेहुण्याच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिण्यांसह 2.40 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता […]
ADVERTISEMENT
पुणे पोलिसांच्या सायबर सेलच्या जाळ्यात अडकलेल्या तुकाराम सुपेंनी मोठी माया कमावल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पहिल्या धाडीत तब्बल 90 लाख रुपये जप्त केल्यानंतर पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा तुकाराम सुपे आणि त्यांच्या मेहुण्याच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिण्यांसह 2.40 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणाचा तपास करत असताना शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आमि शिक्षण विभागात सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या अभिषेक सावरीकर यांना चौकशीनंतर अटक केली होती.
हे वाचलं का?
अटकेच्या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने तुकाराम सुपेच्या घरी धाड टाकली होती. त्यावेळी 88 लाख 49 हजार 980 रोख रक्कम सापडली होती. त्याचबरोबर 5 ग्राम सोन्याचे नाणे, 5 लाख 50,000 हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा पोलिसांनी कारवाई केली.
MHADA Exam : म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच ‘पेपरफुटीच्या रॅकेट’मध्ये; वाचा कसं फुटलं बिंग?
ADVERTISEMENT
‘पत्नी आणि मेहुण्याने पैसे दुसरीकडे लपवले, पण…’
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तुकाराम सुपे यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या पोलिसांची धाड पडण्याआधी तुकाराम सुपेंची पत्नी आणि मेहुण्याने कोट्यवधी रुपये दुसरीकडे लपवले होते. पोलिसांच्या हाताला ही रक्कम सापडू नये म्हणून ही रक्कम लपवण्यात आली. मात्र, पोलिसांनी घराची कसून झाडाझडती घेतल्यानंतर तब्बल 2 कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असे एकूण 2 कोटी 40 लाख रुपयांचं घबाड पोलिसांनी जप्त केलं.
TET Exam Scam : पैसे, सोनं, एफडी… तुकाराम सुपेंच्या घरात सापडलं लाखो रुपयांचं घबाड!
असा केला होता घोटाळा?
म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिली. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरून त्याच्यासोबत असलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या एजंटच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवल्याचं त्यांनी कबूल केलं.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT