Nanded Hounor Killing: पोरीला जाळून राख नदीत फेकली; खुनाचं बिंग कसं फुटलं?
Nande Hounor Killing : नांदेड : जिल्ह्यातील लिंबगाव पिंपरी महिपाळ गावात पोटच्या मुलीची प्रेमप्रकरणामुळे (Murder) हत्या केल्याची संतप्त घटना 26 जानेवारी दिवशी उघडकीस आली आहे. (BHMS Student) बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षी शिकत असलेल्या 23 वर्षीय शुभांगी जोगदंडचा (Shubhangi Jogdand) तिच्याच आई-वडील, दोन भाई आणि मामाने गळा आवळून खून केला. गावातीलचं तरुणासोबत तिचं प्रेमसंबध (Love Affair) होतं. […]
ADVERTISEMENT
Nande Hounor Killing : नांदेड : जिल्ह्यातील लिंबगाव पिंपरी महिपाळ गावात पोटच्या मुलीची प्रेमप्रकरणामुळे (Murder) हत्या केल्याची संतप्त घटना 26 जानेवारी दिवशी उघडकीस आली आहे. (BHMS Student) बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षी शिकत असलेल्या 23 वर्षीय शुभांगी जोगदंडचा (Shubhangi Jogdand) तिच्याच आई-वडील, दोन भाई आणि मामाने गळा आवळून खून केला. गावातीलचं तरुणासोबत तिचं प्रेमसंबध (Love Affair) होतं. गावात आपली नाचक्की होईल, या भितीने तिची हत्या करण्यात आली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून शेतातच तिचा मृतदेह जाळून त्याची राख गोदावरी खोऱ्यात टाकली. 4 दिवस या घटनेची माहिती कोणालाही लागली नाही. मात्र एका फोनमुळे या खुनाचं बिंग फुटलं. (A secret phone call led to a murder spree.)
ADVERTISEMENT
एका गुप्त फोनमुळे खुनाचं बिंग फुटलं.
सोमवारी शुभांगी शेजाऱ्यांना दिसली नसल्याने कुजबुज सुरु झाली. गुरुवारी एका खबऱ्याने फोन करुन पोलिसांना शुभांगीची हत्या करुन जाळून टाकल्याची माहिती दिली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता शुभांगीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यामध्ये पोलिसांनी शुभांगीचे वडील जनार्धन जोगदंड, भाऊ कृष्णा जोगदंड, चुलत भाऊ गिरधारी जोगदंड आणि मामा केशव कदम यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यांच्याच जबाबातून हत्या झाल्याचं समोर आलं.
Honour Killing: डॉक्टर होणाऱ्या पोटच्या पोरीची आई-बापानेच केली राख!
हे वाचलं का?
लिमगाव पोलीस ठाण्यात कलम 302, 201,120 अन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाने अवघ्या नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुलीच्या मारेकऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
Kalyan Crime: 19 वर्षाच्या तरुणाचा कहर, प्रेयसीसाठी केलं असं काही..
ADVERTISEMENT
हत्येचं कारण काय?
शुभांगी बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र शुभांगीच्या कुटुंबीयांनी ते मान्य केले नाही. दुसरीकडे, कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी शुभांगीचं झटपट लग्न जुळवून तिचा साखरपुडा देखील उरकला होता, मात्र आठच दिवसांपूर्वी शुभांगीच्या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाल्याने तिचं जुळलेलं लग्न मोडण्यात आलं.
ADVERTISEMENT
सोयरिक मोडल्याने आता गावात आपले नाव बदनाम होईल या रागातून मागी रविवारी (22 जानेवारी) आई-वडिलांनी शुभांगीच्या मामा आणि तिच्या दोन भावांच्या साथीने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्वतःच्या शेतात नेऊन जाळूनही टाकला. तसंच कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी या सर्वांना शुभांगीच्या मृतदेहाची राख ही जवळच असलेल्या गोदावरी नदीत फेकून दिली. गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने हे प्रकरण उघड झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT