देशाला एका Conductor सारख्या पंतप्रधानांची गरज उद्धव ठाकरेंचा टोला, फडणवीस म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाला एका कंडक्टरसारख्या आगे बढो म्हणणाऱ्या पंतप्रधानाची गरज आहे. असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बेस्टच्या इलेक्ट्रिकल बस उद्गघाटन कार्यक्रमात हा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. इलेक्ट्रिकल बस चांगली आहे? असं मी विचारलं त्यावेळी मला उत्तर मिळालं की ही बस खरोखर चांगली आहे. आवाज प्रचंड कमी आहे. तेव्हा मी आशिषला विचारलं की बसची घंटा आहे का? तो म्हणाला आहे. तो बेल मारून कंडक्टर आगे बढो म्हणतो. मला नेहमी असं वाटायचं की असा कुणी तरी पंतप्रधान पाहिजे की जो देशाला सांगतो आहे आगे बढो. तो काम सुद्धा तिकिट देण्याचंच करायचा. काही साम्यस्थळं आढळली तर सांगायला पाहिजे ना असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान याच टोल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी फक्त ते होणार आहेत का? एवढा एकच छोटा प्रश्न विचारून उत्तर दिलं आहे.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

हे वाचलं का?

1874 ते 2021 हा बेस्टने केलेला प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रिक बस प्रदूषण न करणाऱ्या पर्यावरणपूरक बस आहेत. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचारी प्रवासी यांना दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकिट यापुढे चालावे असेही नियोजन कऱण्यात येते आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळातही बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केली. कोरोना काळात काही कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधितही झाले काहींचे मृत्यूही झाले. तरीही बेस्ट थांबली नाही. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ADVERTISEMENT

गेल्या काही काळापासून निसर्ग चक्र बदललं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. एकेक गोष्टींचे निर्बंध आपण सावधगिरीने शिथील करतो आहोत. हॉटेल्स आणि रेस्तराँ मालक शुक्रवारी भेटून गेले. त्यांनी वेळांमध्ये शिथीलता देण्याची मागणी केली आहे. लोकल प्रवासासंदर्भातही निर्णय घ्यायचा आहे. कोरोना उलटणार नाही ना? हे पाहावे लागेल. असंही वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT