ठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण, कोरोनानंतर नवं संकट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: कोरोनातून बरे झालेले रुग्णांना आता म्युकोरमायकोसिस या नव्या आजाराशी झगडत आहेत. याच आजाराचा पहिला रुग्ण आता ठाणे जिल्हयात आढळून आला आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एक ५६ वर्षीय महिलेला म्युकोरमायकोसिसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र, याचदरम्यान त्या महिलेची रोग प्रतिकार शक्ती कमालीची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. जेव्हा या चाचण्याचा अहवाल आला तेव्हा महिलेला म्युकोरमायकोसिसची लागण झाल्याचं समोर आलं.

ADVERTISEMENT

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी महिलेची तपासणी केली असता महिलेच्या डोळे बरेच सुजलेले दिसून आले. तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले. तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणे आढळून आले. उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती तसेच इतरही अंतर्गत लक्षणे वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आले. या आधारे महिलेला म्युकरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यात कोरोनाचे स्ट्रेन देखील बदलत आहेत. यानुसार काही जिल्ह्यांमध्ये कोरोना या आजारात रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांच्यात म्युकोरमायकोसिस नावाचा आजार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.

हे वाचलं का?

यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. म्युकोरमायकोसिस नावाचा हा संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे पण कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. अत्यंत घातक असा हा संसर्ग आहे. यामुळे काही जणांनी आपले डोळे गमवल्याच्या देखील घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. तर काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

म्युकोरमायकोसिसची लक्षणं:

ADVERTISEMENT

म्युकोरमायकोसिसमुळे सुरुवातीला पापणीला सूज येते, पापण्या जड होतात, डोळ्यांभोवतीची त्वचा काळपट होते, डोळ्यांची हालचाल मंदावते, धुरकट दिसू लागते, नाकावर सूज येते, नाक चोंदते, चेहऱ्यावर एका बाजूने सूज येते, डोळ्यांमध्ये वेदना होतात. म्युकोरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीत देखील होवू शकतो, यामुळे डोळा कायमचा निकामी होतो. शिवाय पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT