Weekend Lockdown-काय सुरू राहणार आणि काय बंद 13 प्रश्नांची सरकारने दिली उत्तरं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रासह मुंबईत वीकएन्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन हे या वेळच्या उपक्रमाचे नाव आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी मोडणे हा ब्रेक द चेनचा मुख्य उद्देश आहे. अशात काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद अशा 13 प्रश्नांची उत्तरं सरकारने दिली आहे. वाचा सरकारने कोणत्या प्रश्नाला काय उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

१)मॉल्स, बिग बाझार, डी मार्ट, आर मार्ट, खुले राहू शकतात का?

जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या कुठल्याही अस्थापना सकाळी सात ते रा. आठ पर्यंत खुली राहू शकतात. कोव्हिड प्रोटोकॉल्सचं पालन करून आवश्यक वस्तू नसणारा विभाग बंद ठेवता येईल.

हे वाचलं का?

२) वीक एन्ड लॉकडाऊन कुठल्या गोष्टी खुल्या आणि कुठल्या गोष्टी बंद राहतील?

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्व गोष्टी खुल्या राहू शकतात. योग्य कारणाशिवाय कोणताही माणूस बाहेर पडू शकणार नाही.

ADVERTISEMENT

३) एपीएमसी मार्केट वीकएन्ड लॉकडाऊन खुलं राहू शकतं का?

ADVERTISEMENT

कोव्हिड प्रतिबंधाचे पालन करून एपीएमसी मार्केट खुलं राहू शकतं.

४) बांधकाम साहित्य पुरवाणारी दुकानं खुली राहू शकतात का?

नाही

५)गॅरेजेस, स्पेअर पार्ट विकणारी दुकानं खुली राहू शकतात का?

मोटार गॅरेज खुली राहू शकतील पण स्पेअर पार्टची दुकानं बंद राहतील.

६) पीएसयू किंवा केंद्रीय कर्मचारी हे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांमध्ये येतात का?

पीएसयू किंवा केंद्रीय कर्मचारी यांना जर अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट केलं गेलं असेल तेच राहू शकतात.

Weekend Lockdown: आज रात्री 8 वाजेपासून विकेंड लॉकडाऊन; पाहा काय सुरु, काय बंद

७)दारू विकत घेता येईल का?

हो, बारमधून दारू विकत घेता येऊ शकेल पार्सल म्हणून किंवा होम डिलिव्हरी

८)लिकर शॉप होम डिलिव्हरीसाठी खुली राहणार का?

नाही

९)रस्त्याच्या बाजूला असलेले ढाबे सुरू राहणार का?

होय पण फक्त पार्सल सेवा

१०)इलेक्ट्रिक, होम अप्लायन्सेस यांची दुकानं आणि रिपेअरिंग शॉप्स खुली राहणार का?

नाही

११) डेस्कटॉप, लॅपटॉप विकणारी दुकानं खुली राहणार का?

नाही

१२) आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र ही खुली राहणार का?

हो सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत

१३) रेस्तराँमधून रात्री 8 नंतर आणि सकाळी 7 च्या आधी जेवण किंवा पार्सल मागवता येईल का?

होम डिलिव्हरी सर्व्हिसेस जसे की स्विगी आणि झोमॅटो यांच्याकडून मागवू शकता मात्र ग्राहकांना या वेळांच्या आधी जाऊन पार्सल घेता येणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT