Crime : 6 मुलांच्या पित्याने पत्नीची हत्या करून कापले पाय, नंतर कढईत…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून क्रूरतेची सीमा ओलांडल्याची बातमीसमोर आली आहे. पाकिस्तानातील एका महिलेची ही कथा आहे जिच्या पतीने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवण्यात आला. येथे कमालीची क्रूरता दिसून आली.

ADVERTISEMENT

पाकिस्तानी मीडियातून समोर आलेली बातमी अशी आहे की, 13 एप्रिल 2022 रोजी कराचीमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह एका भांड्यात टाकून आपल्याच सहा मुलांसमोर उकळला. पोलिसांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कराचीमध्ये एका व्यक्तीने आधी आपल्या पत्नीचा चेहरा उशीने दाबून खून केला आणि नंतर पत्नीचा मृतदेह मुलांसमोर एका कडईमध्ये उकळला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून कढईतूनच महिलेचा मृतदेह बाहेर काढला. महिलेचं नाव नरगिस असं आहे.

काय होतं प्रकरण?

पाकिस्तानच्या मीडिया हाऊस जिओ न्यूजनुसार, आशिक बाजौर नावाचा एक व्यक्ती कराचीच्या गुलशन इक्बाल भागातील एका खाजगी शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता. आणि त्याच शाळेच्या सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होता. गेल्या नऊ महिन्यांपासून ही शाळा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या 15 वर्षीय मुलीला या घटनेची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत आरोपी आशिक आपल्या तीन मुलांसह तेथून पळून गेला होता. या घटनेनंतर तिन्ही मुले प्रचंड घाबरली आहेत.

हे वाचलं का?

क्रुरतेची सीमा गाठली

आरोपी आशिक याने आधी पत्नीच्या तोंडावर उशी दाबली नंतर तिचा गळा आवळून खून केल्याची बाब मुलांनी पोलिसांना दिलेल्या जबानीवरून समोर आली आहे. त्यानंतर मुलांसमोर पत्नीचा मृतदेह एका मोठ्या पातेल्यात टाकून तो उकळू लागला. यादरम्यान महिलेचा एक पाय तिच्या शरीरापासून वेगळा झाला. मात्र, आरोपी आशिकने हे कृत्य का केले, याची माहिती अद्यापपर्यंत पोलिसांना मुलांकडून मिळू शकली नाही. सध्या पोलीस आरोपीच्या शोधासाठी छापेमारी करत आहेत, मात्र अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT