आईवर अंत्यसंस्कार करण्यास मुलाचा नकार; सरकारी अधिकाऱ्याने दिला अग्नी
धनंजय साबळे अकोला: कोरोनाचं (Covid-19) संक्रमण टाळण्यासाठी खरं तर सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. पण काही जण या संकटाच्या काळात एवढे निर्दयी झाले आहेत की, सामाजिक अंतर नव्हे तर माणुसकीलाचा अंतर देऊ लागले आहेत. अशीच एक विचित्र घटना मदर्स डेच्या पूर्वसंध्येला घडली आहे. अकोल्यातील महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी प्रशांत राजूरकर हे गेल्या वर्षभरापासून अकोला मेडिकल […]
ADVERTISEMENT
धनंजय साबळे
ADVERTISEMENT
अकोला: कोरोनाचं (Covid-19) संक्रमण टाळण्यासाठी खरं तर सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. पण काही जण या संकटाच्या काळात एवढे निर्दयी झाले आहेत की, सामाजिक अंतर नव्हे तर माणुसकीलाचा अंतर देऊ लागले आहेत. अशीच एक विचित्र घटना मदर्स डेच्या पूर्वसंध्येला घडली आहे.
अकोल्यातील महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी प्रशांत राजूरकर हे गेल्या वर्षभरापासून अकोला मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्या सर्व मृतदेहांची सर्व जबाबदारी घेत त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थित कोरोना नियमावलीनुसार प्रत्येक मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. पण यावेळी त्यांना येणारे काही अनुभव हे अत्यंत दुर्दैवी आहेत. असाच एक दुर्दैवी अनुभव त्यांना पुन्हा एकदा आला आहे.
हे वाचलं का?
स्मशानभूमीही गहिवरली: Corona मृत्यू झालेल्या 19 मृतदेहांवर उस्मानाबादमध्ये एकाचवेळी अंत्यसंस्कार
अकोला शहरातील एका बांधकाम ठेकेदाराच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला. याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याने मृत महिलेच्या मुलाला दिली व अंतिम संस्कारासाठी तुम्ही मोहता मिल या स्मशानभूमीमध्ये या असा निरोपही धाडला.
ADVERTISEMENT
पण बराच वेळ झाला तरीही मृत महिलेचा मुलगा काही आला नाही. आरोग्य खात्याकडून वारंवार फोन करण्यात आले पण संबंधित व्यक्ती फोन देखील उचलत नसल्याने शेवटी संध्याकाळी आरोग्य विभागाचा व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास बोलावले. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याच्या भीतीने मी अंत्यसंस्कार करण्यास येणार नाही असं थेटपणे सांगितलं. एवढंच नव्हे तर आरोग्य विभागातील व्यक्तीला त्याने तसं लिहून देखील दिलं.
ADVERTISEMENT
याला म्हणतात माणुसकी.. वर्षभरापासून Covid Positive मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे बहाद्दर
शेवटी आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले. पण यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी प्रशांत राजूरकर यांनी या संपूर्ण घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी स्वत: जरी महिलेवर अंत्यसंस्कार केले असले तरी हे कर्तव्य महिलेच्या मुलाचं होतं आणि ते त्याने पार पाडायला हवं होतं अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. खरं तर आरोग्या विभागाने मृत महिलेवर यथासांग अंतिम संस्कार करुन आपलं शासकीय कर्तव्य तर पार पाडलंच पण अद्याप माणुसकी जिवंत आहे हे देखील त्यांनी दाखवून दिलं.
माणूसकी महत्वाची! गावकऱ्यांनी जबाबदारी नाकारली, सांगलीत मुस्लीम बांधवांनी हिंदू महिलेवर केले अंत्यसंस्कार
पण दुसरीकडे ज्या मायमाऊलीने आपल्याला हे जग दाखवलं. मोठं केलं त्याच माय माऊलीच्या अंतिम संस्कारासाठी पोटचा मुलगा न आल्याने अधिकाऱ्यांनी संताप देखील केला आहे. पण यावेळी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत आपल्यात मात्र माणूसकी शिल्लक आहे हे अवघ्या जगाला यानिमित्ताने दाखवून दिलं. यावेळी अधिकाऱ्यांनी फक्त आपल्या सरकारी पगारापुरतंच नाही तर माणुसकीच्या नात्याला जपत आपलं कर्तव्य पार पाडून समाजासमोर एक नवा आदर्श देखील ठेवला आहे. (the mothers death due to corona the son refusal to perform the final rites in akola)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT