उपाशी विठोबा ते खुन्या मुरलीधर, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही-अजित पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे तिथे काय उणे ? असं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पुण्यात आल्यावर येतोच. पुणेरी पाट्या तर सोशल मीडियावर इतक्या व्हायरल होत असतात की काय सांगायचं. अहो एवढंच काय पुणेकरांनी नावं ठेवताना देवानांही सोडलं नाही. सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा, खुन्या मुरलीधर अशी देवांची नावं इथेच ऐकायला मिळतात. पुणेकरांनी नावं ठेवताना देवांना सोडलं नाही जागांची आणि माणसांची काय कथा? असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते संजीव उद्यानाचा भूमिपूजन सोहळा झाला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

‘नेहमी म्हटलं जातं की पुणे तिथे काय उणे? ते अगदी खरं आहे. जे जगात सापडत नाही ते पुण्यात सापडतं आणि नावं ठेवण्यात तर आपल्या पुणेकरांचा हात कुणीच धरणार नाही. पुण्याच्या पाट्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या पोहचल्या आहेत. तुम्ही बघा आपण अनेक शहरांमध्ये जातो आपल्या इथे काय म्हणतात? पासोड्या मारूती, सोट्या म्हसोबा. नुसतं म्हसोबा नाही तर सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा, दाढीवाला दत्त, पानमोड्या म्हसोबा, डुल्या मारूती, जिलब्या मारूती यातला गंमतीचा भाग सोडा पण पुणेकरांनी नावं ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही.’

हे वाचलं का?

आत्ता आपण उभे आहोत त्याला डुक्कर खिंड म्हणतात. याचं कारण इथे पूर्वीच्या काळी रानडुकरांचा वावर होता असं जुनी जाणती लोकं सांगतात. याचं नाव काढलं तरी खून, मारामाऱ्या अशा घटनाही समोर येतात. इथे पडलेल्या कचरा आणि घाणींचे ढिगारे आपल्या पुण्याचं नाव मातीत घालतात असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आठवड्यातून एकदा पुण्यातल्या, पिंपरीतल्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यांनाही याबाबत सूचना केल्या आहेत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. स्वच्छतेच्या बाबत लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहे. सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रम स्थळी हजर झाले. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. अजित पवारांच्या फटकेबाजीने भल्या सकाळी पुणेकर हसण्यात दंगून गेले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT