उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्लान, कृपाल तुमानेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचलं. शिंदेंनी केलेलं बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरलं. पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंची शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनीच हा गौप्यस्फोट केलाय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे आणि शिंदे समर्थक मुंबईत गर्दी करू लागले आहेत. दसरा मेळाव्यात कोण ताकद दाखवणार याची चर्चा सुरू असतानाच आता शिंदे गटातले खासदार कृपाल तुमाने यांनी मोठं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलीये.

शिंदे गट देणार उद्धव ठाकरेंना धक्का, कृपाल तुमानेंचा दावा काय?

मुंबईत यंदा दोन दसरे मेळावे होणार आहेत. पहिला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा बीकेसीवर. त्यामुळे शिंदे दसरा मेळाव्यातून काय वॉर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी एक दावा केलाय.

हे वाचलं का?

दसऱ्याच्या मुहूर्तावर २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केलाय. कृपाल तुमाने हे नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी निमित्त आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळीच तुमाने यांनी हा दावा केलाय.

राजकीय वर्तुळात शिंदे गटाच्या मार्गावर असलेले २ खासदार आणि ५ आमदार कोण अशी चर्चा सुरू झालीये. याबद्दलही तुमाने यांनी एक विधान केलंय. तुमाने म्हणाले, शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या दोन खासदारांपैकी एक खासदार मुंबईचा असेल, तर दुसरा खासदार मराठवाड्यातील असू शकतो, असं तुमानेंनी म्हटलंय. त्यामुळे शिंदेंच्या मेळाव्यात कोण प्रवेश करणार याकडे सगळ्यांची नजर असणार आहे.

ADVERTISEMENT

शिंदे गटाकडून शिवसेनेचा धनुष्यबाण मिळवण्याचे प्रयत्न

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आलाय. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जातंय. त्यात हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून पक्षातील लोकांचा शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला पाठिंबा असून, खरी शिवसेना आम्हीच असल्याचं दाखवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात आहे. त्याचबरोबर १९ पैकी १२ खासदारांनीही एकनाथ शिंदेंना समर्थन दिलंय. त्यामुळे पक्षातील लोकप्रतिनिधींच्या बाबतीत शिंदे यांचं पारड उद्धव ठाकरेंच्या तुलनेत जड आहे. त्यात आता आणखी ५ आमदार आणि २ खासदार आले, तर ठाकरेंसाठी हा मोठा झटका असेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT