RT-PCR : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा! आरटीपीसीआरची सक्ती नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. आरटीपीसीआर चाचणी अहवालाची सक्ती शिथिल करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची सोमवारी (6 सप्टेंबर) रत्नागिरीत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी आरटीपीसीआर निर्णयाबद्दल माहिती दिली.

उदय सामंत म्हणाले, ‘माझं याबाबत दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यानंतर हा निर्णय मी जाहीर करत आहे. आता कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा मोठा निर्णय आहे. मात्र, गावात आलेल्या चाकरमान्यांच्या तपासणीबाबत ग्राम कृतीदलांना आदेश दिलेले आहेत. चाकरमानी आणि गावच्या लोकांनी त्यासाठी सहकार्य करावं’, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

‘गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी आरटीपीसीआर करणे सक्तीचे नाही. केवळ खबरदारी म्हणून चाकरमानी अॅण्टीजेन टेस्ट करु शकतात. आरटीपीसीआर केली नाही म्हणून चाकरमान्यांना गावात कोणी अडवणार नाही’, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे संभ्रम

ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासनाने कोकणात परणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशासंदर्भात आदेश काढले होते. या आदेशावरून गोंधळ उडाला होता. सुरुवातीला दोन डोस घेतलेल्यांना आणि 72 तासांपुर्वी आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार होता. अन्य मंडळींना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार होती. या आदेशांमुळे चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

आरटीपीसीआर सक्ती नको; भास्कर जाधवांनी केली होती सूचना

दरम्यान, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही आरटीपीसीआर सक्तीबद्दल जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या होत्या. ‘मुंबईत करोना संसर्गाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे, तिथून येणाऱ्यांमुळे करोना संसर्ग वाढणार नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कुठेही रस्त्यात थांबवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी किंवा अँटिजेन चाचणी केली जाणार नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा पिळवणूक केली जाणार नाही. याबाबतची स्पष्ट चर्चा स्थानिक जिल्हा प्रशासनाशी करण्यात आलेली आहे’, असं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT