“डुप्लिकेट शिवसेनेच्या मुख्यनेत्याचं भाषण म्हणजे फक्त मोदी-शाह चालिसाचं वाचन”-उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडलेले महाराष्ट्राने पाहिले. अशात या दोन्ही मेळाव्यांची आणि त्यात झालेल्या भाषणांची चर्चा अद्याप थांबताना दिसत नाही. आता सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार प्रहार करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा म्हणजे भोजनभाऊंची गर्दी होती असा उल्लेख सामनातून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडलं आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उल्लेख मा.मु.

तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मा.मु. असाही करण्यात आला आहे. तसंच संपूर्ण मेळावा भाजपने आखून दिला होता आणि स्क्रिप्टही भाजपचीच होती जी वाचावी लागली. त्यामुळे डुप्लिकेट शिवसेनेचा मेळावा म्हणजे मोदी-शाह चालिसाचं पठण होतं असंही म्हणण्यात आलं आहे. असं उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे?

शिवतीर्थावर दसरा मेळावा होऊ नये म्हणून मिंधे गटाने प्रयत्न केले. मिंधे गटाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बीकेसी मैदानावरच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं मी मनात आणलं असतं तर शिवाजी पार्क त्यांना मिळू दिलं नसतं. ही धमकी समजावी की सत्तेची मस्ती? शिवसेनेला शह वगैरे देण्यासाठी दुसरा दसरा मेळावा म्हणे बीकेसी मैदानात झाला. त्या मैदानावरची गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केलं की पाहा हीच आमची खरी शिवसेना. पण शिवसेनेला शवसेना म्हणत बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांच्या पाठिंब्यावर तुमचा तो मेळावा झाला. मेळावा कसला? सध्या भाजपने एक इव्हेंट युग आपल्या देशात आणलं आहे. त्यात जन्मापासून मयताप्रयत्न उत्सव किंवा इव्हेंटच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत इव्हेंट बीकेसी मैदानावर झाला, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

Dasara Melava: आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

नारायण राणेही चकीत झाले असतील

तेच, तेच आणि तेच रडगाणे याशिवाय या मेळाव्यात काय होतं? नारायण राणेंनीही अचंबित होऊन तोंडात बोटं घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले. भाजपच्या गोटात गेलेल्यांना अशा ओकाऱ्या काढव्याच लागतात नाहीतर त्यांना बैलांप्रमाणे ईडीकडून बडवलं जाईल. नाव शिवसेनेचं आणि मेळावा भाजपचा असाच थाट होता. कारण डुप्लिकेट शिवसेनेच्या मेळाव्यातील मुख्य नेत्याचं भाषण म्हणजे मोदी-शाह चालिसाचं वाचन होतं. पठणही नव्हतं, फक्त वाचन. भाजपनेच या इव्हेंटची कथा-पटकथा लिहिली असल्याने मुख्य भाषणाचा मसुदा, रंगमंचावरची पात्रं, त्यांच्या भूमिका, संवाद, हे सगळं तिकडून लिहूनच आलं होतं.

ADVERTISEMENT

“उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा म्हणजे शिमगा त्यावर काय बोलायचं?” देवेंद्र फडणवीसांचा टोला

ADVERTISEMENT

बीकेसीवरच्या रडकथेत खोट्या आरोपांशिवाय काहीच सापडत नाही

बीकेसीवरच्या रडकथेत माझ्यावर कसा अन्याय झाला आणि मीच कसा खरा या रडकथेपलिकडे काहीच सापडत नाही. देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला नरेंद्र मोदींविषयी आदर, प्रेम, आस्था आहेच. पण ज्या डुप्लिकेट सेनेचा मेळावा की उत्सव बुधवारी झाला त्याचं वेगळं अस्तित्व नव्हतं. मिंधे गट जणू भाजपमध्ये विलीन होऊनच तुताऱ्या आणि पिपाण्या वाजवत आहे असं चित्र होतं. मोदी-मोदी आणि शाह-शाह अशा जेवढ्या गर्जना भाजपच्या मेळाव्यात होत नसतील तेवढ्या डुप्लिकेट सेनेच्या मेळाव्यात झाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT