Ulhasnagar: पत्नीशी अवैध संबंधाच संशय, मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
social share
google news

Ulhasnagar Crime man killed his elder brother: उल्हासनगर: पत्नीशी अनैतिक संबंध (illicit relationship) असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्याच मोठ्या भावाची हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. याप्रकरणी आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी अटकही केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली, अमित रमेश गांगुर्डे (वय 34 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. तर रोहित रमेश गांगुर्डे (वय 37 वर्ष) असे मृताचे नाव आहे. (on suspicion of having an illicit relationship with his wife the elder brother was killed by throwing a stone on his head)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, अमित रमेश गांगुर्डे आणि रोहित रमेश गांगुर्डे हे दोघे भाऊ अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीजवळच्या परिसरात राहत होते. दोन्ही भावांची आजी ही उल्हासनगर परिसरात राहते. रोहितचा 11 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. रोहितला 8 वर्षांची मुलगी असून, लहान भाऊ अमितचा विवाह वर्षभरापूर्वी विठ्ठलवाडी येथे झाला होता.

Crime : पुतण्याचे काकीशी अनैतिक संबंध अन् हत्या, ‘असा’ झाला भांडाफोड!

हे वाचलं का?

साधारण 6 महिन्यांपूर्वी अमितची पत्नी आणि अमितचा मोठा भाऊ रोहित यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जोरदार भांडण झालं होतं. दररोज होणाऱ्या भांडणामुळे व्यथित झालेल्या रोहितची पत्नी ही काही महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. त्यानंतरही भांडण थांबत नसल्याने अमितची पत्नीही विठ्ठलवाडीत तिच्या माहेरी निघून गेली. त्यामुळे दोन्ही भाऊही आपलं घर सोडून उल्हासनगर येथे आजीच्या घरी राहू लागले होते.

काल (शुक्रवारी) दुपारी एकच्या सुमारास मोठा भाऊ रोहित कामावरून घरी परतला आणि येऊन झोपी गेला. साधारण दीड वाजेच्या सुमारास धाकटा भाऊ अमितही घरी आला. तेव्हा रोहित गाढ झोपलेला असल्याचं त्याला दिसला. त्यावेळी अमित लगेच घराच्या बाहेर आला आणि त्याने एक मोठा दगड उचलून झोपलेल्या रोहितच्या डोक्यात घातला. त्यामुळे रोहितच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच निपचीत पडला. थोड्याच वेळात रोहितचा मृत्यू झाला. दरम्यान, समोर बेडवर बसलेली त्यांच्या आजीने हा सगळा प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला.

ADVERTISEMENT

Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड

ADVERTISEMENT

घटनेनंतर लगेचच अमित मोटारसायकलवरून पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पोलिसांना सांगितले की, मी माझ्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. पोलिसांनी तात्काळ अमितला ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्याच्या आजीच्या घरातच रोहितचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर अमितला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT