मोठी बातमी: आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना देशभर लोकसभा निवडणूक लढवणार!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना देशभरात लोकसभेच्या निवडणुका लढवणार आणि त्यासाठी तयारी देखील सुरु केली आहे. अशी अत्यंत महत्त्वाची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता देशभरात आपल्या पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच आदित्य ठाकरे हे गोव्यावरुन परतले आहेत. आता ते लवकरच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर देखील जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच आदित्य ठाकरेंसोबत उत्तर प्रदेशला भेट देणार आहोत. तिथे अखिलेश यादव सरकार स्थापन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लोकसभा निवडणूक लढवू, त्यासाठी तयारी सुरू आहे.’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

Goa Conclave: ‘जे महाराष्ट्रात घडलं तेच गोव्यातही होईल, पुन्हा BJPचा मुख्यमंत्री होणार नाही’, राऊतांचा दावा

ADVERTISEMENT

‘शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार मांडला जात नाही’

ADVERTISEMENT

‘शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो.’ अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोव्यात घेतली होती. गोव्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. गोव्यात निवडणुकीच्या नंतर घोडेबाजार होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यावर आपलं मत काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार भरत नसतो असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. तसंच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कारण आम्हाला इथल्या भूमिपुत्राचा विकास करायचा आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं.

‘भाजपसोबत आमची युती होती, त्यामुळे इतके दिवस आम्ही त्यांचा विचार करून निवडणूक लढवत नव्हतो. मित्र पक्षाला त्रास द्यायचा नाही, त्यांचा सीट शेअर कमी करायचा नाही असं आमचं धोरण होतं. मात्र भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता जिथे आमचं अस्तित्व होतं तिथे आता आम्ही पुन्हा तयारीला लागलो आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही गोव्यात ११ जागा लढवत आहोत. घरोघरी जाऊन प्रचार केला जातो आहे. शिवसेनेचं जे काही असतं ते खुलेपणाने आणि पारदर्शकपणे असतं.’

‘भाजपचे लोक जर हे म्हणत आहेत की आमच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे, आमचे उमेदवार कमकुवत आहेत. मग त्यांना भाजप घाबरतं का? होऊद्या प्रचार.’ असं थेट आव्हानही आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT