Nitin Gadkari: खासदार-आमदार टोल का भरत नाहीत?, नितीन गडकरींना थेट सवाल; पाहा काय दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: सर्वसामान्य जनता ही महागड्या टोलनाक्यामुळे हैराण झाली आहे. पण खासदार आणि आमदार टोल का भरत नाहीत? असा थेट सवाल ‘अजेंडा आज तक’ या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी देखील या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘सरकारने शेतकरी, खासदार आणि आमदार, लष्कर, रुग्णवाहिका, ट्रॅक्टरने माल घेऊन जाणाऱ्यांना सूट दिली आहे. मात्र, प्रत्येकाला सूट देणं शक्य नाही. जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील तर त्यासाठी पैसे मोजावेच लागतील.’ असं गडकरी यावेळी म्हणाले.

‘सुविधा हवी तर पैसे द्यावे लागतील’

हे वाचलं का?

गडकरी म्हणाले की, ‘पूर्वी लोक ट्रॅफिकमध्ये अडकायचे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर बरेच पैसे वाया जायचे. आता चांगले रस्ते बांधल्यामुळे पैसा वाचतोय, मग त्याऐवजी टोल भरायला काय हरकत आहे?’ असा सवाल करत गडकरींनी टोलमध्ये सध्या तरी काहीही दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘रस्ते बनविण्यासाठी सरकारने पैसे उधार घेतले आहेत. ज्याची परतफेडही करावी लागत आहे आणि त्याचे व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळेच टोल आकारावा लागतोय. त्याचबरोबर आता देशातील छोट्या-छोट्या लोकांच्या पैशातून देखील सरकार रस्ता बनवणार आहे.’ असं गडकरींनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

इन्फ्रा बॉण्डचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, ‘तुम्ही बँकेत पैसे ठेवले तर किती व्याज मिळते? जर आपण रस्ते बांधण्यासाठी पैसे दिले तर सरकार त्यावर जास्त व्याज देईल. दिल्ली-मुंबई महामार्गावर एक लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत, त्यामुळेच बाँडच्या स्वरूपात लोकांकडून पैसे घेतले जातील.’

ADVERTISEMENT

पुढे ते असंही म्हणाले की, देशात 26 ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवले जात आहेत. दोन वर्षांत रस्त्याने दिल्लीहून 8.5 तासात श्रीनगरला पोहचता येणार आहे. रस्ते बनवताना आम्ही पारदर्शक, परिणामाभिमुख, वेळेचे बंधन आणि गुणवत्ता यासाठी जागरूक आहोत.’

देशातल्या टोल नाक्यांबाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले….

‘अजेंडा आज तक’ला हे दोन वर्षांनी पुन्हा एकदा भरविण्यात आलं आहे. आज (3 डिसेंबर) आणि 4 डिसेंबर रोजी राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून विज्ञानापर्यंत मंथन करणारे अनेक दिग्गज आज तकच्या महामंचावर आले आहेत. आजपासून दोन दिवस रंगणाऱ्या आज तकच्या या कार्यक्रमात राजकारणातील ‘खेळाडू’ हे निवडणुकीवर देखील चर्चा करणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT