जीन्सचं राहूद्या…फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होतेय. यावरच आता महाराष्ट्रातील शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केलीये.

ADVERTISEMENT

उर्मिला मातोंडकर यांनी यांसंदर्भात ट्विट केलंय. उर्मिलला त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “मान्यवर…फाटलेल्या जीन्सबाबत देशातील कर्तबगार युवक सांभाळून घेतील. मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?” असा थेट सवाल करत उर्मिला यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

Tirath Singh Rawat: उत्तराखंडच्या नव्या CMचं महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य, तुफान टीका

हे वाचलं का?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी महिलांविषयी कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?

एका कार्यक्रमात बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सबाबत असं म्हटलं होतं की, ‘गुडघ्यावर फाटलेली जीन्स महिला फाटलेल्या घालतात. हे सगळं काय सुरु आहे? हे कशाप्रकारचे संस्कार आहेत? मुलांवर याचे काय संस्कार होतील? मुलांवर कसे संस्कार व्हावे हे पालकांवर अवलंबून असतं.’ असं वक्तव्य रावत यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

यानंतर मुख्यमंत्री रावत यांच्यावर अनेकांनी टीका केल्या. आतापर्यंत अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, जया बच्चन, गुल पनाग, तसंच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिलीये. यावेळी अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांनी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करताना विचार करायला हवा अशी टीका केलीये. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांनी तर तुमचा मेंदू फाटका आहे अशा शब्दांत तीरथ सिंह रावत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर चौफेर टीका होतेय. यावरच आता महाराष्ट्रातील शिवसेन्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केलीये.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT