त्र्यंबकेश्वरमध्ये कालसर्प विधीचे यजमान पळवल्याच्या वादावरून पुरोहितांमध्ये हाणामारी
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक कालसर्प शांती आणि नारायण नागबळीच्या विधींसाठी त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र याच त्र्यंबकेश्वरमध्ये यजमान पळवल्याच्या वादावरून पुरोहित भिडले आहेत. एवढंच नाही तर या सगळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचंही कळतं आहे. नाशिक : कांदे व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड, आयकर विभागाने जप्त केले २५ कोटी काय घडलं नेमकं प्रकरण? त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी करण्यासाठी […]
ADVERTISEMENT
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
कालसर्प शांती आणि नारायण नागबळीच्या विधींसाठी त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र याच त्र्यंबकेश्वरमध्ये यजमान पळवल्याच्या वादावरून पुरोहित भिडले आहेत. एवढंच नाही तर या सगळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचंही कळतं आहे.
नाशिक : कांदे व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड, आयकर विभागाने जप्त केले २५ कोटी
हे वाचलं का?
काय घडलं नेमकं प्रकरण?
त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी करण्यासाठी आलेले यजमान पळविल्याच्या कारणावरून पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पौरोहित्य करणाऱ्या पुजारी बांधवांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री हिरावाडी परिसरात घडली.
ADVERTISEMENT
पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व अकरा जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.हे सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे पौरोहित्य करण्याचा व्यवसाय आहे, असे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
नागपूरचे एक यजमान धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. त्यावेळी आपले यजमान पळविल्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता पुन्हा पौरोहित्य करणाऱ्या भावंडांच्या टोळीत बाचाबाची झाली आणि हाणामारी सुरू झाली यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल गस्त घालत असताना त्यांना मारहाण प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. संशयितांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली एका वाहनात एक गावठी कट्टा आणि ११ जिवंत काडतुसे तर दुसऱ्या कारमध्ये धारधार कोयत्यासारखे शस्त्र आढळून आले. त्यावरून या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये ही घटना घडल्यामुळे पूजा विधीच्या प्रकरणात गुन्हेगारीचा शिरकाव झाल्याची चर्चा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होते आहे. कालसर्प योग आणि नारायण नागबळी यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठी आर्थिक उलाढाल त्र्यंबकेश्वरमध्ये होते. ही आर्थिक उलाढालच संघर्षाचं कारण ठरल्याचं दिसून येतं आहे. त्र्यंबकेश्वरचा पुरोहित संघ हा स्थानिकांचा आहे. तर नाशिकसह राज्यातील पुरोहितांची बहउद्देशीय ब्राह्मण संघटना असे दोन गट आहेत. भाविकांची फसवणूक होऊ नये म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये काही वर्षांपूर्वी मोठे फलकही लावण्यात आले होते. त्याचीही बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर पूजाविधीसाठी पुरोहितांना ओळखपत्र देण्यात आली. मागच्या वेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात पुरोहितांच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT