महाराष्ट्र दिनी मुंबईतील पाच लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिका प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा मोजकाच साठा उपलब्ध झाला आहे. या अनुषंगाने 1 मे 2021 म्हणजेच आज महापालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण केलं जाणार आहे. हे लसीकरण कोविन या अॅपवर नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठीच असणार आहे. तसेच आज लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे.

ADVERTISEMENT

Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री

येणाऱ्या काही दिवसांमध्ये लसींचे डोस ज्या प्रमाणात प्राप्त होतील त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व पात्र नागरिकांचं लसीकरण व्हावं यासाठी महापालिकेने आवश्यक ते नियोजन केलं आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये. तसंच लस घेण्यासाठी येताना आणि केंद्रावर आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असंही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या कोणत्या पाच केंद्रांवर आज उपलब्ध होणार लस?

नायर सर्वोपचार रूग्णालय – मुंबई सेंट्रल

ADVERTISEMENT

सेठ छत्रभुज गांधी व मोनाजी अमिदास व्होरा सर्वोपचार रूग्णालय- घाटकोपर

ADVERTISEMENT

डॉ. रूस्तम नरसी कूपर रूग्णालय – जुहू, विलेपार्ले

सेव्हन हिल्स रूग्णालय-अंधेरी

वांद्रे-कुर्ला संकुल जंबो कोव्हिड सेंटर

‘महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू व्हावं ही मुख्यमंत्र्यांची इच्छा..’

या पाच ठिकाणी 18 ते 44 या वयोगटाचं लसीकरण केलं जाणार आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने पत्रक काढून दिली आहे. मुंबई महापालिकेच्या या केंद्रांवरच दिवसभरात लसीकरण होणार आहे. पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर मुंबईत पुढचे तीन दिवस लसीकरण बंद राहिल हे देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 या वयोगाटासाठी महाराष्ट्र दिवसापासून लसीकरण सुरू करावं अशी इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार हे लसीकरण मुंबईत सुरू करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रत्येक राज्यासाठी वेगळं अॅप असावं अशीही मागणी केली. दोन दिवसांपूर्वी जेव्हा कोविन अॅपवरून 18 ते 44 या वयोगटासाठी नोंदणी सुरू झाली होती तेव्हा हे अॅप क्रॅश झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक राज्यासाठी वेगळं अॅप तयार करण्याची संमती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागितली आहे. आता त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT