दिल्लीत तणाव! तोडफोड, पोलीस कर्मचारी जखमी; हनुमान जयंती शोभयात्रेदरम्यान काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जेएनयूमध्ये झालेल्या घटनेनंतर दिल्लीत पुन्हा एकदा हिंसक घटना घडली आहे. हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभयात्रेदरम्यान हिंसेचा भडका उडला. काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड करत हैदौस घातला. यात पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसक घटनानंतर आता दिल्लीत हनुमान जयंतीला हिंसाचार घडला. हनुमान जयंती निमित्त शोभयात्रा काढण्यात आली होती. या शोभयात्रेदरम्यान काही समाजकंटकांनी दगफफेक आणि गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. समाज कंटकांनी पोलिसांनाही निशाणा बनवलं.

हे वाचलं का?

या हिंसक प्रकारानंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, घटनेनंतरचे दृश्ये समोर आली आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड केलेल्या गाड्या दिसत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हिंसक प्रकार घडत असताना पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले, मात्र समाजकंटकांनी पोलिसांनाच लक्ष्य केलं.

दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितलं की, आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. या हिंसेप्रकरणी कडक कारवाई केली जाईल. दिल्लीतील सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे,’ असं पोलीस आयुक्त म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दगडफेकीबरोबरच दोन ते तीन फैऱ्या गोळीबारही करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याच गोळीबारात एक पोलीस कर्मचारी गोळी लागून जखमी झाला आहे. त्याचबरोबर इतर लोकही जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांच्या तुकड्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेची थेट दहशतवादी हल्ल्याशी तुलना केली आहे. दिल्लीतील जहागीर पुरी येथे हनुमान जन्मोत्सवावर झालेली दगडफेक ही दहशतवादी घटना आहे. बांगलादेशी घुसखोरांची वस्ती आता भारताच्या नागरिकांवर हल्ला करण्याची हिंमत करू लागली आहे. यांचा प्रत्येक कागद तपासून बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं झालं आहे,’ असं मिश्रा यांनी म्हटलं आहे.

या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘सर्व नागरिकांनी शांतता पाळावी. शांततेशिवाय देश प्रगती करू शकत नाही. दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मी लोकांना आवाहन करतो की शांतता पाळावी,’ असं केजरीवाल म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनेनंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. घटनेची माहिती घेऊन कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासंदर्भात शाह यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT