कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथे पत्नीवर सत्तूराने अमानुषपणे वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पत्नीच्या हत्येनंतर जमलेल्या लोकांना हातातील धारदार सत्तूर नाचवत आरोपी दहशत निर्माण करत असल्याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे. निर्दयी पतीचा 25 जानेवारीचा खळबळजनक आणि थरकाप उडवणारा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

इम्तियाज नदाफ याने आपल्या 28 वर्षीय पत्नीच्या अंगावर अनेक वार करुन तिची हत्या केल्याचं व्हायरल व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मूळची रेंदाळ इथली समीना नदाफ आणि इम्तियाज नदाफ यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना दोन अपत्येही आहेत. हुपरी येथे हे दाम्पत्य राहत होते.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सातत्याने काही कारणावरुन वाद होते होते. 25 जानेवारीला देखील आपला फोन उचलत नाही यावरुन पती इम्तियाजने पत्नी समीनासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

पण हा वाद एवढा टोकाला पोहचला की, इम्तियाजने सफिनावर धारदार शस्त्रानं वार करुन तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

चिकनचा व्यवसाय करणारा इम्तियाज हा एक प्रकारे माथेफिरूच होता. 25 जानेवारीला देखील अतिमद्य प्राशन करुन सोबत सत्तूर घेऊन हुपरीत समीना चालवत असलेल्या गाड्याजवळ आला आणि तिच्यासोबत भांडण करत तिच्यावर थेट सत्तूरने वार सपासप वार केले.

ADVERTISEMENT

जीवाच्या आकांताने समीना रस्त्यावर पळत सुटली आणि जीव वाचवण्याच्या हेतूने ती एका इस्त्रीच्या दुकानात घुसली.

हुपरीतील मुख्य चौक रोड नेहमी नागरिकांची गर्दी असते, त्यामुळे इथे देखील लोकांची गर्दी होती. पण, कोणाचीही तमा न बाळगता अत्यंत शांत डोक्याने, निर्दयीपणे इम्तियाजने दुकानात घुसून समीनाच्या अंगावर पुन्हा सपासप वार करण्यास सुरुवात केली.

यावेळी काही जणांनी इम्तियाजचा हा सगळा घृणास्पद प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. आता हाच व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.

यावेळी जमलेल्या नागरिकांच्या दिशेने दहशत निर्माण करण्यासाठी इम्तियाज सत्तूर जमावाकडे दाखवतं पुन्हा सपासप वार करीत निर्दयपणाचा कळस गाठत होता. यावेळी काही मंडळींनी बघ्याची भूमिका घेत आपल्या मोबाइलवर वरुन थेट लाईव्ह व्हिडिओ शूट केला.

Crime: इंजिनिअर मुलाने आई-वडिलांसमोर केली पत्नीची हत्या, मुंडकं कापून फेकलं नाल्यात तर धड टाकून दिलं जंगलात

सध्या या व्हायरल व्हीडिओची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. व्हीडिओ शूट करण्यापेक्षा इम्तियाजला वेळीच रोखलं असतं तर आज समीनाचा जीव नक्कीच वाचला असता.

दरम्यान, संपूर्ण घटनेनंतर बऱ्याच वेळानंतर जमावातील काही तरुणांनी इम्तियाजला पकडून हुपरी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT