जुन्नरमध्ये पतसंस्थेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा; व्यवस्थापकाचा गोळीबारात मृत्यू

मुंबई तक

–स्मिता शिंदे, जुन्नर जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर आज (24 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पतसंस्थेत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक गोळ्या झाडल्या. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला. १४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्गालगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्मिता शिंदे, जुन्नर

जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर आज (24 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. पतसंस्थेत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक गोळ्या झाडल्या. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला.

१४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्गालगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हेल्मेट घातलेल्या व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला.

धक्कादायक ! चोरीच्या उद्देशाने स्फोटकं लावून ATM मशिनमध्ये घडवला स्फोट, पैसे घेऊन चोरटे पसार

हे वाचलं का?

    follow whatsapp