परीक्षा घोटाळ्याचा ‘वडझरी पॅटर्न’, महिला पोलीस कर्मचाऱ्याने केली पोलखोल, डमीला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

ADVERTISEMENT

परीक्षा घोटाळ्याच्या वडझरी पॅटर्नची बीडमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यानी पोलखोल केली आहे. म्हाडाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी विद्यार्थ्याला तब्बल पाऊण किलोमीटर पाठलाग करत, सिनेस्टाईल पकडण्यात आले आहे. यावेळी त्याच्याकडून मायक्रोचीप जप्त करण्यात आली असून या अगोदरही पकडण्यात आलेल्या डमी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

अर्जुन बिलाल बिलोट रा. कन्नड तालुका जिल्हा औरंगाबाद असे पकडण्यात आलेल्या आरोपी डमी विद्यार्थ्याचे नाव आहे. तर राहुल किसन सानप रा.वडझरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव आहे.

हे वाचलं का?

बीड शहरातील दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरवर, मंगळवारी म्हाडाची परीक्षा सुरू होती यादरम्यान राहुल सानप याची परीक्षा देण्यासाठी, अर्जुन बीलाल बिलोट हा बीडमध्ये आला होता.राहुल सानप याने अर्जुन बिलोट याला मध्यरात्री एक वाजता आणलं आहे.तर यावेळी राहुल सानपच्या नावावर अर्जुन बिलोट हा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करत होता.

ADVERTISEMENT

यादरम्यान ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी संगीता सिरसट आणि संजय राठोड यांना संशय आला. यादरम्यान त्याची तपासणी केली असता संशय अधिकच बळावला. यावेळी त्याने पोलिस कर्मचारी राठोड यांना धक्का मारून तेथून धूम ठोकली. मात्र यावेळी महिला कर्मचारी संगीता सिरसट यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. तर संजय राठोड हे देखील त्यांच्या पाठोपाठ मोटरसायकलवर गेले. यादरम्यान अर्जुन बिलोट एका रिक्षामध्ये बसून पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यावेळी संगीता सिरसट आणि संजय राठोड यांनी, बिलोट बसलेल्या रिक्षाचा सिनेस्टाईल पाठलाग करत अखेर त्याला पकडलं.

ADVERTISEMENT

डमी विद्यार्थी असलेल्या अर्जुन बिलोट याच्यावर यापूर्वी ही परीक्षा घोटाळा संदर्भात औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अर्जुन बिलाल बिलोट याच्यासह राहुल किसन सानप याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT