मुंबई महापालिकेचं तीन दिवस ‘वॉक इन’ व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह
मुंबई तक: मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये सोमवारपासून तीन दिवस ‘वॉक इन लसीकरण’ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार 60 वर्षांवरच्या व्यक्तींना बुधवार पर्यंत पहिला आणि दुसरा डोस थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार आहे. सोमवारी 24 मे ते बुधवारी 26 मे पर्यंत चालणाऱ्या या वॉक इन व्हॅक्सिनेशन मोहिमेमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा […]
ADVERTISEMENT
मुंबई तक: मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये सोमवारपासून तीन दिवस ‘वॉक इन लसीकरण’ करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार 60 वर्षांवरच्या व्यक्तींना बुधवार पर्यंत पहिला आणि दुसरा डोस थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार आहे.
ADVERTISEMENT
सोमवारी 24 मे ते बुधवारी 26 मे पर्यंत चालणाऱ्या या वॉक इन व्हॅक्सिनेशन मोहिमेमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर 45 वर्षांवरील व्यक्ती आणि फ्रंट लाईन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर्स यांना लसीचा दुसराच डोस मिळणार आहे. पण ज्यांना कोव्हॅक्सिन लस घ्यायची आहे त्यांना मात्र लसीचा पहिलाच डोस देण्यात येणार आहे.
दुसऱ्या डोससाठी नवीन नियमानुसारच निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यानुसार 12 ते 16 आठवड्यांनंतरच दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्यानुसार ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि 84 दिवसांचं अंतर पूर्ण केलं आहे. अशाच व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
27 मे नंतर मात्र नियमित नोंदणी करुन मगच लसीचे डोस देण्यात येणार असल्याचं मुंबई महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात 18 ते 44 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण बंद आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT