Narendra Modi Government ने आणलेली Bad Bank नेमकी आहे तरी काय? समजून घ्या
मोदी सरकार देशात एक नवी बँक सुरू करतंय…Bad Bank. Bad Bank म्हणजे खराब-वाईट बँक असा तंतोतंत त्यांचा अर्थ होत नाही…पण नावानेच तुम्हाला कोड्यात टाकणारी ही Bad Bank नेमकी आहे तरी काय? केंद्र सरकार ही बँक का सुरू करतंय? तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य खातेदारांना या बँकेचा काय फायदा? हेच आज समजून घेऊयात… सगळ्यात पहिले Bad Bank म्हणजे […]
ADVERTISEMENT
मोदी सरकार देशात एक नवी बँक सुरू करतंय…Bad Bank. Bad Bank म्हणजे खराब-वाईट बँक असा तंतोतंत त्यांचा अर्थ होत नाही…पण नावानेच तुम्हाला कोड्यात टाकणारी ही Bad Bank नेमकी आहे तरी काय? केंद्र सरकार ही बँक का सुरू करतंय? तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य खातेदारांना या बँकेचा काय फायदा? हेच आज समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
सगळ्यात पहिले Bad Bank म्हणजे काय ते समजून घेऊ,
Bad Bank म्हणजे अशी एक बँक जिथे देशभरात जितके NPA- Non Performing Assets असतील, ते Bad Bank मध्ये टाकले जातील. Non-performing Assets म्हणजे काय? तर उदाहरणाखातर पकडू की SBI किंवा HDFC ही एक बँक आहे,आणि या बँकेने एका व्यक्तीला किंवा कंपनीला 1000 कोटींचं कर्ज दिलं असेल, आणि त्या व्यक्तीने केवळ 700 कोटी चुकते केले, उरलेले 300 कोटी चुकते केलेच नाहीत, तर हे 300 हजार कोटी Non-performing Assets होतात. हेच Non-performing Assets म्हणजेच NPA बॅड बँकेत टाकले जातील.
हे वाचलं का?
समजून घ्या : Bitcoin म्हणजे काय? भारतात
क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करता येतात का?
असं का केलं जाईल?
ADVERTISEMENT
जे 300 कोटी बँकेला परत आलेलेच नाहीयेत, ते NPA म्हणून बँकेच्या बॅलेन्स शीटमध्ये टाकले जातात. म्हणजेत बँकेचा तोटा किती झालाय, याचीही नोंद बँकेच्या बॅलेन्स शीटमध्ये होते. कुठल्याही बँकेला आपल्या बॅलेन्स शीटमध्ये जास्त NPA ठेवायला आवडत नाही. जितके जास्त NPA तितकं ग्राहकांच्या डोक्यात बँकेची छबी-इम्प्रेशन खराब होतं. का? तर जसं एका व्यक्तीकडून बँकेला 300 कोटी परत आले नाही, तशाप्रकारचा तोटा अनेक कर्जधारकांकडून होऊ शकतो. इतका तोटा बँकेच्या बॅलेन्स शीटमध्ये दिसत राहिला, तर ग्राहक सुद्धा असा विचार करतील की ही बँक एक दिवस तोट्याने बुडून जाईल, या भीतीने त्या बँकेत पुढचे व्यवहार करायला कदाचित खातेदार 10 वेळा विचार करतील, व्यवहार थांबवतीलही. त्यामुळे ग्राहकांच्या मनात बँकेची इमेज चांगली राहावी, यासाठी आपल्या बॅलन्स शीटमधून NPA काढून म्हणजेच थकलेली रकमेची नोंद हटवून या बॅड बँकेला दिली जाईल.
ADVERTISEMENT
Petrol Diesel Under GST : शंभरीवर गेलेलं पेट्रोल 70 रूपयांत कसं मिळणार? | समजून घ्या
बॅड बँकेत गेल्यावर त्या पैशांचं काय होणार? बॅड बँक कशी काम करणार?
बॅड बँकेच्या रेकॉर्डमध्ये 300 कोटी गेले म्हणजे ते पैसे बँक विसरली असं होत नाही. Bad Bank ही स्पेशलाईज्ड असणार आहे कर्ज परत मिळवण्यात. ज्या व्यक्तीने 300 कोटींची थकबाकी ठेवली असणार आहे, ते वसुल करण्याचं काम ही Bad Bank करणार, आणि मग ज्या बँकेने मूळ कर्ज दिलेलं होतं, त्यांना परत देणार. पण त्यात सुदधा काही नियम आहेत. सरकारने ज्या गाईडलाईन्स ठरवल्या असतील, त्या प्रमाणात बँकेला परत करणार. म्हणजे 300 कोटी पूर्णच्या पूर्ण मूळ बँकेला परत नाही करणार, पण त्यातलं काही मूल्य म्हणजे साधारण 150 कोटी परत करणार.
आता कमी पैसे येण्यामागे बँकेचा फायदा काय? तर अख्खे 300 कोटी बुडण्यापेक्षा किमान 150 कोटी परत मिळणं बँकेसाठी कधीही फायद्याचंच आहे.
अर्थात ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याइतक्या सोप्प्या नाहीयेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय जो इकॉनॉमिक सर्व्हे करतो, त्या 2017 च्या सर्व्हेमध्येच देशात एक Bad Bank असावी असं सांगितलेलं. RBI च्याही काही माजी गर्व्हर्नर्सने असं सुचवलेलं, पण त्याचा फॉरमॅट ठरवणंसुद्धा तितकंच आव्हानात्मक होतं.
माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलेलं की अशाने बँक गृहित पकडायला लागतील, म्हणजेच, Bad Bank पैसे परत मिळवून देणार आहेच, मग कर्जावर कर्जावर वाटली जातील बँकांकडून आणि अशाने बॅड बँकवरील बोजा वाढत जाईल, खूप मोठ्या प्रमाणावर NPAसुद्धा वाढत जातील.
Swiss Bank : काळा पैसा स्वीस बँकेतच का ठेवला जातो? किती काळा पैसा भारतात परत आला?
हे सगळं करण्यामागचं उद्दिष्ट सुद्धा समजून घ्या…
बँक ही संकल्पना आली आहे, मूळात ग्राहकांचे पैसे-वस्तू सुरक्षितरित्या ठेवायला, गुंतवणूक करायला, कर्ज द्यायला… पण कालांतराने घाटाळे आणि थकबाकी वाढू लागल्याने बँकांवर कर्ज वसुल करण्याचाच भार वाढू लागला. PNB, Yes Bank ही तर आपल्या डोळ्यादेखतची उदाहरणं आहेत… बँकांवरचा हाच भार कमी व्हावा यासाठी ही Bad Bank सुरू करण्यात येणारे.
ही Bad Bank कशी काम करते हे आपण उदाहरणाने समजून घेतलं…पण केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता देताना ही Bad Bank कशी असेल हे ही सांगितलं, ते पाहूया
1. National Asset Reconstruction Company Limited ही Bad Bank म्हणून सुरू करण्यात येते. त्याच्या स्थापनेसाठी ३०,६०० कोटी रुपयांच्या सरकारी हमीच्या तरतुदीची घोषणा याआधीच अर्थसंकल्पात करण्यात आलेली.
2. प्रामुख्याने ५०० कोटी रुपये किंवा अधिक रकमेच्या वसुली पूर्णपणे थकलेली कर्ज प्रकरणे Bad Bank दिली जातील. या कर्जांची जबाबदारी स्वत:कडे घेताना, ‘NRCL’ कडून बँकांना कर्ज रकमेच्या १५ टक्के रोख मोबदला आणि उर्वरित ८५ टक्के रकमेच्या मूल्याचे रोखे दिलं जाईल.
3. पुढील पाच वर्षांत वसुली पूर्ण थकलेल्या बँकांच्या एकूण दोन लाख कोटी रुपयांच्या कर्ज मालमत्ता ‘बॅड बँके’मार्फत ताब्यात घेतल्या जाऊन बँकांवरील भार हलका केला जाईल
4. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे Bad Bank ची ५१ टक्के भागभांडवली मालकी म्हणजेच स्टेक असतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT