Miss Universe 2021: मिस युनिव्हर्सला बक्षिसात नेमकं काय-काय मिळतं?
जगाला मिस युनिव्हर्स 2021 मिळाली आहे. यावर्षी भारताच्या 21 वर्षीय हरनाज कौर संधूने सौंदर्य स्पर्धेचे हे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले आहे. इस्रायलमध्ये झालेल्या या सोहळ्यात मिस युनिव्हर्स 2021 ची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा हिने हरनाझच्या डोक्यावर हिऱ्यांचा सुंदर मुकुट चढवला. मिस युनिव्हर्सचा किताब कोण जिंकणार याची उत्सुकता लोकांना असते, पण यासोबतच लोकांच्या मनात […]
ADVERTISEMENT
जगाला मिस युनिव्हर्स 2021 मिळाली आहे. यावर्षी भारताच्या 21 वर्षीय हरनाज कौर संधूने सौंदर्य स्पर्धेचे हे प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले आहे. इस्रायलमध्ये झालेल्या या सोहळ्यात मिस युनिव्हर्स 2021 ची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा हिने हरनाझच्या डोक्यावर हिऱ्यांचा सुंदर मुकुट चढवला.
ADVERTISEMENT
मिस युनिव्हर्सचा किताब कोण जिंकणार याची उत्सुकता लोकांना असते, पण यासोबतच लोकांच्या मनात आणखी काही प्रश्न नक्कीच निर्माण होतात. मिस युनिव्हर्सला मिळणाऱ्या मुकुटाची नेमकी किंमत किती असते?, त्यात जडवलेला हिरा आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट परिधान करणाऱ्या विश्वसुंदरीला मिळालेली बक्षिसाची रक्कम किती असते? यासारखे अनेक प्रश्न विचारले जाता. चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं.
सौंदर्य स्पर्धांच्या इतिहासातील सर्वात महागडा मुकुट
हे वाचलं का?
मिस युनिव्हर्सचा मुकुट वेळोवेळी बदलला जातो. 2019 मध्ये, मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे नवीन ज्वेलरी, Mouawad Jewelry ने Mouawad Power of Unity Crown तयार केला.
2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या Zozibini Tunzi, 2020 मध्ये मेक्सिकोच्या अँड्रिया मेझा आणि आता मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू यांनी आतापर्यंतचा सर्वात महागडा मुकुट परिधान केला आहे.
ADVERTISEMENT
या मुकुटाची किंमत तब्बल 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. जी भारतीय चलनानुसार 37,8790,000 रुपये म्हणजेच 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
ADVERTISEMENT
हा ताज निसर्ग, सामर्थ्य, सौंदर्य, स्त्रीत्व आणि एकतेने प्रेरित आहे. हा मुकुट 18 कॅरेट सोन्याचा, 1770 हिऱ्यांपासून बनविला गेला आहे. ज्यामध्ये मध्यभागी 62.83 कॅरेट वजनाचा शील्ड-कट गोल्डन कॅनरी हिरा आहे. ताजमधील पाने, पाकळ्या आणि वेलींच्या रचना या सात खंडांतील समुदायांचे प्रतिनिधित्व करतात.
मात्र, हा खराखुरा मुकुट विजेतीला मिळत नाही. हा मुकुट फक्त निकालाच्या दिवशी विजेत्या स्पर्धकाला परिधान केला जातो. मात्र, या प्रचंड महागड्या मुकुटाऐवजी त्याची एक प्रतिकृती मिस युनिव्हर्सला दिली जाते.
मिस युनिव्हर्सला काय मिळते?
मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन मिस युनिव्हर्सच्या बक्षिसाची रक्कम कधीच जाहीर करत नाही, मात्र त्यांना लाखो रुपयांचे बक्षीस मिळत असल्याचे सांगितले जाते. मिस युनिव्हर्सला न्यूयॉर्कमधील मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष राहण्याची खुली परवानगी आहे.
हा अपार्टमेंट तिला मिस यूएसएसोबत शेअर करायचा असतो. या एका वर्षाच्या कालावधीत मिस युनिव्हर्ससाठी येथे सर्व गोष्टींची सोय करण्यात आलेली असते. किराणा, वाहतूक सर्वकाही.
विनामूल्य जग प्रवास करण्याची संधी
मिस युनिव्हर्सला सहाय्यक आणि मेकअप आर्टिस्टची एक टीम दिली जाते. मेकअप, केसांची उत्पादने, शूज, कपडे, दागिने, स्किनकेअर इ. सारं काही वर्षभरासाठी मोफत दिले जातात. त्यांना मॉडेलिंगमध्ये अधिक संधी मिळावी या उद्देशाने पोर्टफोलिओ बनवण्यासाठी बेस्ट फोटोग्राफर्सही दिले जातात.
याशिवाय व्यावसायिक स्टायलिस्ट, पोषण, त्वचाविज्ञान आणि डेंटल सेवा देखील पुरवली जाते. विशेष कार्यक्रम, वेगवेगळ्या पार्टी, प्रीमियर, स्क्रीनिंग, कास्टिंगमध्ये प्रवेश.
प्रवासाचा विशेषाधिकार, हॉटेलमध्ये निवास आणि निवासाची संपूर्ण किंमत प्रदान केली जाते. तसेच पुन्हा संपूर्ण जग फिरण्याची संधी देखील मिळते.
मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचं मराठी कनेक्शन, कोण आहे ट्रान्सजेंडर साईशा?
मिस युनिव्हर्सला या सगळ्या सोयी-सुविधा मिळतात पण त्याचबरोबर खूप जबाबदारीही त्यांच्यावर येते. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची मुख्य राजदूत म्हणून तिला कार्यक्रम, पार्टी, धर्मादाय संस्था, पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने जावे लागते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT