Taliban Press Conference : पहिल्या पत्रकार परिषदेत तालिबानने जगाला दिलेली दहा वचनं काय?
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने पहिल्यांदाच मीडियासमोर येत आपली बाजू मांडली आहे. मंगळवारी काबूलहून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय समुदायांना तालिबानबाबत वाटणाऱ्या चिंतेबाबत मुजाहिद यांनी वक्तव्य केलं. इतकंच नाही तर महिलांप्रती तालिबानचं धोरण काय असेल? आंतरराष्ट्रीय संस्थांशी तालिबानचे संबंध कसे असतील अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरंही देण्यात आली आहेत. तालिबनाच्या पहिल्या पत्रकार परिषदेत […]
ADVERTISEMENT
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने पहिल्यांदाच मीडियासमोर येत आपली बाजू मांडली आहे. मंगळवारी काबूलहून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय समुदायांना तालिबानबाबत वाटणाऱ्या चिंतेबाबत मुजाहिद यांनी वक्तव्य केलं. इतकंच नाही तर महिलांप्रती तालिबानचं धोरण काय असेल? आंतरराष्ट्रीय संस्थांशी तालिबानचे संबंध कसे असतील अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरंही देण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
तालिबनाच्या पहिल्या पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्यात तालिबानतर्फे जगाला काय दहा वचनं देण्यात आली आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत.
हे वाचलं का?
काय आहेत तालिबानने जगाला दिलेली वचनं?
1) अफगाणिस्तानच्या मातीचा उपयोग एकाही देशाविरोधात कट रचणं किंवा हल्ला करण्यासाठी केला जाणार नाही
ADVERTISEMENT
2) तालिबान कोणत्याही आंतरराष्ट्रीय दुतावासाचं नुकसान करणार नाही. उलट तालिबान या दुतावासांना संरक्षण देईल. काबूलमध्ये असलेल्या दुतावासांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही सगळ्या देशांना आश्वस्त करू इच्छितो की सगळ्या दुतावासांची, आंतरराष्ट्रीय संघटनांची आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एजन्सींची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे.
ADVERTISEMENT
3) महिलांना शरिया कायद्याच्या अंतर्गत अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. आरोग्य विभाग आणि शाळा यांसाठी महिला काम करू शकतील.महिलांना मीडियामध्ये काम करता येईल का? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा मुजाहिद यांनी थोडे आढेवेढे घेत उत्तर दिलं. तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना शरिया कायद्याप्रमाणे काय काय सूट दिली जाईल ते आम्ही जाहीर करू असं मुजाहिद म्हणाले.
4) प्रायव्हेट मीडिया स्वतंत्र रूपाने काम करू शकणार आहे, मात्र पत्रकारांनी अफगाणी मूल्यांचा आब राखला पाहिजे हे महत्त्वाचं आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
5) अफगाणिस्तानात आता युद्ध संपलं आहे, ज्या कुणी तालिबानविरोधात लढाई केली त्यांनाही तालिबानने माफ केलं आहे. कुणाचाही कोणत्याही प्रकारे सूड घेण्याचा काहीही इरादा नाही. यामध्ये माजी सैनिक, अफगाणिस्तान सरकारचे सदस्य कुणीही असो आम्हाला कुणाचाही सूड घ्यायचा नाही.
6) अफगाणिस्तानात कुणीही कुणाचंही अपहरण करू शकणार नाही. एवढंच नाही तर कुणी कुणाची हत्याही करू शकणार नाही. सुरक्षा सातत्याने वाढवली जाणार आहे
7) तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था आणि कायदे व्यवस्था तसंच लोकांचं जीवनमान सुधारणार आहे
8) योग्य कायदे व्यवस्था तयार करणं ही तालिबानची प्राथमिकता आहे.
9) अफगाणिस्तानमध्ये एकाही नागरिकाच्या जिवाची हानी होणार नाही यासाठी तालिबान कटीबद्ध आहे, एवढंच नाही तर कुणीही उगाच तुमच्या दारावर येऊन तुमची चौकशी करणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे
10) अशरफ घनी यांचं सरकार देशासाठी मुळीच योग्य नव्हतं, ते कुणालाही सुरक्षित ठेवू शकत नव्हते मात्र तालिबान असं करणार नाही तालिबान सगळ्यांना सुरक्षा देणार आहे याबाबत विश्वास बाळगा.
तालिबानच्या प्रवक्त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद हा चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यात ही दहा प्रमुख वचनं तालिबानतर्फे देण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT