Who is Kapil Patil: गोपीनाथ मुंडेंनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये आणलेले कपिल पाटील नेमके आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (cabinet expansion) चर्चा मागील महिन्याभरापासून सुरु होती. अखेर 7 जुलै 2021 रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पण या विस्ताराआधी महाराष्ट्रातून (Maharashtra) केंद्रात कुणाकुणाची वर्णी लागणार याचे वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत होते.

ADVERTISEMENT

ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची नावं होती. पण अशावेळी भाजपच्या (BJP) एका अशा नेत्याचं नाव समोर आलं की, ज्यामुळे भाजपमधील नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का बसला. ते नाव म्हणजे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांचं.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) मतदारसंघातील भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांवर मात करुन थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे वाचलं का?

खरं तर सरपंच पदापासून सुरुवात करणाऱ्या कपिल पाटील यांनी केंद्रीय मंत्रिपदापर्यंत जी मजल मारली त्याविषयी आता बरीच चर्चा सुरु झाली आहे. तसंच त्यांचा भाजपमधील प्रवेशाचा किस्सा देखील आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सगळ्या निमित्ताने कपिल पाटील हे नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

कपिल पाटील यांच्या एकूणच कारकीर्दीविषयी थोडक्यात:

ADVERTISEMENT

कपिल पाटील यांचा जन्म 5 मार्च 1961 रोजी भिवंडी तालुक्यातील दिवे या छोट्याशा गावातील एका आगरी कुटुंबात झाला झाला होता. ग्रामीण भागातील कपिल पाटील यांनी बीएपर्यंतच आपलं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आणि त्यांनी आपला मोर्चा सक्रीय राजकारणाकडे वळवला.

ADVERTISEMENT

1988 साली ते पहिल्यांदाच गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तर 1992 साली त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत पंचायत समितीचं सदस्य पद मिळवलं. तर 1997 साली त्यांनी पंचायत समितीचं सभापती पद देखील पटकावलं.

कपिल पाटील यांचा राजकारणातील प्रवास हा चढताच राहिला. कारण 2002 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली आणि 2005 साली कृषी समितीचं सभापती पद मिळवलं. तर 2009 साली त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदही निवड झाली. याच दरम्यान ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षही होते.

दरम्यान, 2014 सालापर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. पण त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन थेट खासदारकीचं तिकिट मिळवलं. मोदी लाटेत ते निवडून देखील आले.

2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. याच दरम्यान त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. याचंच फलित म्हणून आता त्यांची थेट केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

गोपीनाथ मुंडेंनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये कपिल पाटील यांना नेमकं कसं आणलं होतं?

कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर ते फारच चर्चेत आले आहेत. पण त्यांच्या आजच्या यशाची ही सुरुवात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली होती असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

Modi Cabinet Reshuffle: Narayan Rane यांच्यासह Maharashtra मधील मंत्र्यांना मोदींनी कोणती खाती दिली?

2014 साली संपूर्ण देशात मोदी लाट होती. अशावेळी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या खासदारांचा आकडा वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यातच राज्यात गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातील राजकीय शत्रुत्व हे सर्वश्रुतच होतं. अशावेळी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना शह देण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यातील नेते कपिल पाटील यांनाच आपल्या गळाला लावलं.

खरं म्हणजे कपिल पाटील हे सक्रीय राजकारणात होते तरी कधी त्यांनी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत याआधी विजय मिळवला नव्हता. पण 2014 निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शेवटच्या क्षणी गोपीनाथ मुंडे यांनी कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. एवढंच नव्हे तर कपिल पाटील यांना थेट खासदारकीचं तिकीट देखील त्यांनी मिळवून दिलं. त्याच जोरावर मोदी लाटेत ते निवडून देखील आले आणि पहिल्याच फटक्यात लोकसभेत देखील गेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT