Rane यांच्या घराबाहेर जाऊन त्यांनाच आव्हान देणारे Varun Sardesai नेमके आहेत तरी कोण?
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी केल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशा सगळ्यात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी थेट राणेंच्या मुंबईतील (Mumbai) घराबाहेर जाऊन त्यांना आव्हान दिलं. यामुळे वरुण सरदेसाई हे सध्या बरेच चर्चेत आले आहेत. राणेंच्या घराबाहेर शेकडो […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी केल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) प्रचंड आक्रमक झाले आहेत. अशा सगळ्यात युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी थेट राणेंच्या मुंबईतील (Mumbai) घराबाहेर जाऊन त्यांना आव्हान दिलं. यामुळे वरुण सरदेसाई हे सध्या बरेच चर्चेत आले आहेत.
ADVERTISEMENT
राणेंच्या घराबाहेर शेकडो शिवसैनिकांसह जाऊन वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी इथे तुफान राडा देखील पाहायला मिळाला. यामुळे वरुण सरदेसाई हे खूपच चर्चेत आले आहेत. जाणून घेऊया वरुण सरदेसाई नेमकी कोण आहेत.
कोण आहेत, वरुण सरदेसाई?
हे वाचलं का?
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खूप जवळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये राहुल कनल, पूर्वेश सरनाईक, अमेय घोले हे आहेत. पण याच वर्तुळात एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे वरुण सरदेसाई यांचं.
वरुण सरदेसाई यांनी अमेरिकेतल्या कोलंबिया युनिवर्सिटीतून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 28 वर्षांचे सरदेसाई हे कॅबिनेटमंत्री आदित्य यांचे मावस भाऊ आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्या बहीणाचे ते पुत्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून वरुण हे आदित्य यांच्यासोबत सातत्याने वावरत आहेत.
ADVERTISEMENT
सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्या अनेक कार्यक्रमाचं आयोजन हे स्वत: वरुण सरदेसाई हे करत होते. याच माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेनेतही अत्यंत महत्त्वाच्या सचिव पदावर ते कार्यरत आहेत.
ADVERTISEMENT
2019 च्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांना लाँच करण्यासाठी ‘आदित्य संवाद’ नावाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. राज्यभर राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमाची जबाबदारी ही वरुण यांच्याच खांद्यावर होती.
आदित्य यांनी मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. आदित्य यांच्या या पहिल्यावहिल्या निवडणुकीची सारी धुरा, सूत्रं ही वरुण सरदेसाई यांच्याकडेच होती.
शिवसेनेच्या पक्ष संघटनेतही त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं बोललं जातं. आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोचण्याचा एक मार्ग म्हणूनही लोक त्यांची ओळख असल्याचं पक्षात बोललं जातं. त्यामुळेच त्यांना देण्याता आलेल्या एक्स दर्जाच्या सुरक्षेवरून सरकारवर टीका केली जाते.
वरुण सरदेसाई हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांनी मांडलेली भूमिका ही ठाकरे घराण्याची भूमिका मानली जाते. ठाकरे कुटुंब अधिकृतपणे जे बोलू शकत नाही, ते वरुण सरदेसाई बोलतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा असते.
Varun Sardesai: ‘उंदराच्या बिळाखाली, राणेंच्या घराखाली येऊन दाखवलं, वरुण सरदेसाईंचं आव्हान
मागील काही काळापासून रश्मी ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्ष संघटनेवर मोठी पकड निर्माण झाली आहे. एकीकडे वरुण सरदेसाई यांची राजकीय पाळंमुळं घट्ट होत आहेत. अलीकडे आता रश्मी ठाकरे यांच्या भावाचा मुलगा शौनक पाटणकरही प्रकाशझोतात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT