Gujarat Exit Poll 2022: गुजरात पुन्हा भाजपचं, एक्झिट पोलमधील सर्वात अचूक आकडेवारी
Gujarat Exit Poll 2022: गुजरात विधानसभा (Gujarat Vidhansabha) निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र निकालापूर्वीच एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. आज तक-अॅक्सिस माय इंडियाच्या (Aaj tak-axis my india) एक्झिट पोलमध्ये आजपर्यंत गुजरातच्या निवडणुकीची सर्वात अचूक आकडेवारी समोर येत आहे. येथे भाजप, काँग्रेस आणि […]
ADVERTISEMENT
Gujarat Exit Poll 2022: गुजरात विधानसभा (Gujarat Vidhansabha) निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. मात्र निकालापूर्वीच एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. आज तक-अॅक्सिस माय इंडियाच्या (Aaj tak-axis my india) एक्झिट पोलमध्ये आजपर्यंत गुजरातच्या निवडणुकीची सर्वात अचूक आकडेवारी समोर येत आहे. येथे भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. राज्यात दोन्ही टप्प्यात 182 जागांवर मतदान झाले आहे. 27 वर्षांपासून येथे भाजपचे सरकार आहे. (who will win in gujarat know the most accurate figures in aaj tak axis my india exit poll)
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात आज 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये 33 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. सुमारे 63.31 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले.
दरम्यान, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा मोदींनाच सत्ता दिल्याचं पाहायला मिळत आहे. या एक्झिट पोलमध्ये मागच्या वेळेपेक्षा गुजरातच्या जनतेने मोदी आणि भाजपवर विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार भाजपला 100 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे वाचलं का?
गुजरात विधानसभा निवडणूक
इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल:
-
भाजप – 131-151 जागा
ADVERTISEMENT
काँग्रेस – 16-30 जागा
ADVERTISEMENT
आप – 3-05 जागा
इतर – 3-07 जागा
एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. तर 88 जागांसाठी आपचे उमेदवार रिंगणात आहेत. सूरत पूर्व मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. इतर पक्षांपैकी BSP ने 57, BTP 14 आणि CPI(M) ने चार उमेदवार उभे केले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान
दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.70 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यासह 61 पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच 285 अपक्ष उमेदवार आहेत. भाजप आणि आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. तर काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 तर बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगर जिल्ह्यांतील 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे.
2017 साली भाजपने पहिल्या टप्प्यात जिंकलेल्या 48 जागा
2017 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 89 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसने 40 जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराकडे होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने या 93 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 39 तर अपक्ष उमेदवारांना तीन जागा मिळाल्या होत्या. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
मध्य गुजरातमध्ये भाजपला 37 तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. पण उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि त्यांनी 17 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या होत्या.
2017 साली नेमका निकाल काय होता?
गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर भाजपने विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 2017 मध्ये गुजरातमध्ये 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान मतदान झाले होते. तर 18 डिसेंबरला निकाल लागला होता. गुजरात विधानसभेत बहुमतासाठी 92 जागा आवश्यक आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT