Unlock च्या निर्णयाबाबात गोंधळ का उडाला? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
Unlock च्या निर्णयाबाबत गोंधळ का उडाला असल्याने विरोधी पक्षापासून सगळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये समन्वयच नाही असंही विरोधकांनी म्हटलं आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून असं काही झालं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. हा सगळा […]
ADVERTISEMENT
Unlock च्या निर्णयाबाबत गोंधळ का उडाला असल्याने विरोधी पक्षापासून सगळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये समन्वयच नाही असंही विरोधकांनी म्हटलं आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून असं काही झालं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. हा सगळा गोंधळ का उडाला याचं उत्तर आत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकसत्ताच्या झूमच्या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले मुख्यमंत्री अनलॉकच्या गोंधळावर?
गेल्यावेळी म्हणजेच दुसऱ्या लाटेच्या वेळी निर्बंध लावताना मी मुद्दामहून Lockdown हा शब्द वापरला नाही. पण राज्यात लॉकडाऊन सारखेच निर्बंध आम्हाला सरकार म्हणून लागू करावे लागले. त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसला. जेव्हा संसर्गजन्य साथ ही उच्चांक गाठते तेव्हा लॉकडाऊन म्हणजेच एकमेकांशी संपर्क थांबवणे गरजेचं असतं. ते करायला आम्हाला थोडा उशीर झाला. आम्हाला सरकार म्हणून आठ ते पंधरा दिवस आधी हे सगळे निर्बंध आणायचे होते.
हे वाचलं का?
गेल्यावेळी मी सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय जाहीर केला होता. आता जो काही गोंधळ उडाला आहे त्यात एक गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे की हे सगळे निकष ठरवून दिले आहेत. गोंधळून जाऊ नका.. आपण अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. पण आपण स्थानिक प्रशासनाला कोणते निर्बंध ठेवायचे आणि कोणते उठवायचे याचे अधिकार दिले आहेत. आपण सगळे निकष लावून दिले आहेत प्रशासनासाठी लावून दिले आहेत. हे निकष काय आहेत हे नागरिकांना कळावेत म्हणून आपण ते जाहीर केले आहेत. याचा अर्थ निर्बंध उठवले आहेत असा सरसकट अर्थ काढू नका.
याचा अर्थ कुठेही नाही की लॉकडाऊन उठवण्यात आला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केला त्याआधी जी बैठक झाली ती आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक होती. त्यावेळी दोन विषय होते, एक होता दहावी बारावी पऱीक्षेचा आणि दुसरा विषय होता की अनलॉक विषयीचे निकष ठरवण्याचा. ते निकष ठरवायचेच होते. ते मी वाचले ते मला पटले. मात्र विजय वडेट्टीवारांना वाटलं की हा निर्णय झाला त्याप्रमाणे त्यांनी हे जाहीर केलं. त्यांचा कुठेतरी गैरसमज झाला असावा असंही आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यांची चूक नव्हती, काय काय होऊ शकतं याचे अपडेट्स घ्या असंही सांगितलं होतं. वडेट्टीवार जे म्हणाले होते तेच नियम जाहीर करण्यात आले आहेत मात्र हे सगळे नियम प्रशासनासाठी आहेत आणि त्यामध्ये पारदर्शकता असावी म्हणून जनतेसाठी आम्ही ते जाहीर केले आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT