Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा कठोर लॉकडाऊन होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) साधारण फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) सुरु झाली. या दुसऱ्या लाटेने अवघ्या काही महिन्यात भयंकर रुप धारण केलं होतं. त्यामुळे राज्य शासनाला दुसऱ्यांदा संपूर्ण राज्यात कठोर लॉकडाऊन (Lockdown) करावा लागला होता. मात्र, आता मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसून आल्याने सरकारने लेव्हलनुसार त्या-त्या जिल्ह्यात अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केली.

ADVERTISEMENT

अनलॉक प्रक्रिया सुरु होताच कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय चिंताजनक बाब म्हणजे मृतांचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे. यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?

हे वाचलं का?

सर्वात आधी आपण गेल्या आठवड्याभरातील कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा यावर एक नजर टाकूयात:

  • 13 जून 2021: दिवसभरात 10,442 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 483 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

ADVERTISEMENT

  • 12 जून 2021: दिवसभरात 10, 697 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 360 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • ADVERTISEMENT

  • 11 जून 2021: दिवसभरात 11,766 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 406 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • 10 जून 2021: दिवसभरात 12,207 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 393 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • 9 जून 2021: दिवसभरात 10,989 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 261 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • 8 जून 2021: दिवसभरात 10,291 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 295 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • 7 जून 2021: दिवसभरात 10,219 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 154 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • 6 जून 2021: दिवसभरात 12,557 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर तब्बल 233 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

  • मागील आठवड्याभराच्या आकडेवारीवरुन आपल्याला लक्षात येईल की, राज्यात दररोज 10 ते 12 हजार नवे रुग्ण सापडत आहे. तर 300 हून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.

    दुसरी लाट अटोक्यात आणण्यासाठी आता लॉकडाऊन लागू करुन जवळजवळ तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मागील दोन आठवड्यापासून राज्यात लेव्हलनुसार प्रत्येक जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. पण असताना आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाची चिंता वाढली आहे.

    यामुळे जर पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा वेग वाढू लागला तर सरकार कठोर लॉकडाऊन करु शकतं. याबाबतचे संकेत आज (14 जून) राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

    Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…

    ‘नवीन आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण कमी आणि नवीन रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. आताच यावर भाष्य करता येणार नाही पण पुढील ८ दिवसांमध्ये परिस्थिती कशी असेल हे पहावं लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळुहळु वाढताना दिसत आहे. आपण काही सवलती आणि सूट दिल्यामुळे हा प्रकार घडतोय. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर एकंदर स्थितीचा आढावा घेऊन नव्याने निर्बंध घालावे लागतील.’ पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते.

    जर पुढील आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे आता जरी राज्यात काही भागात निर्बंध शिथिल केलेले असले तरीही राज्यातील जनतेने कोरोनासंबंधी नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळेच आपण कोरोनाला आळा घालू शकणार आहोत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT