PUNE: ‘बापट पॅटर्न’ने? रवींद्र धंगेकरांना बनवलं कसब्याचा आमदार?
Ravindra Dhangekar: पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे कसब्याचा (Kasba) आमदार कोण होणार? भाजप (BJP) त्याचबरोबर महाविकास आघाडीने (MVA) आपली सर्व ताकद कसब्यामध्ये लावली होती. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसब्यात विजय मिळवला आणि भाजपच्या 28 वर्षापासून असलेल्या गडाला सुरुंग लावला. धंगेकरांचा विजय झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरु झाली अशा कुठल्या गोष्टींमुळे कसब्यात […]
ADVERTISEMENT

Ravindra Dhangekar: पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे कसब्याचा (Kasba) आमदार कोण होणार? भाजप (BJP) त्याचबरोबर महाविकास आघाडीने (MVA) आपली सर्व ताकद कसब्यामध्ये लावली होती. अखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) कसब्यात विजय मिळवला आणि भाजपच्या 28 वर्षापासून असलेल्या गडाला सुरुंग लावला. धंगेकरांचा विजय झाल्यानंतर साहजिकच चर्चा सुरु झाली अशा कुठल्या गोष्टींमुळे कसब्यात रवींद्र धंगेकरांना विजय सोपा झाला. धंगेकरांच्या विजयामागचं एक गमक सांगितलं जातं ते म्हणजे बापट पॅटर्न. (with bapat pattern ravindra dhangekar was made mla of the kasba peth constituency)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये बापटांच्या राजकारणाचा उल्लेख केला. आता नेमका हा बापट पॅटर्न काय आहे हे आपण समजावून घेऊया.
कसब्याची लढाई भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतरच लगेचच कसब्याची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सुरुवातीला भाजप टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु अखेर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीनंतर टिळक कुटुंबीयांनी नाराजी देखील व्यक्त केली होती.
1995 पासून गिरीश बापट हे कसब्याचे आमदार होते. 2019 ला गिरीश बापट खासदार झाल्यानंतर मुक्ता टिळक यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपचा गड कायम राखण्यात मुक्ता टिळक यांना यश आलं. कसबा मतदारसंघामध्ये ब्राह्मण मतदार अधिक असल्याने यंदा ब्राह्मण उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाजामध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. कसब्याचं समीकरण पाहिलं तर कसब्यात ब्राह्मण मतदारांची संख्या ही 13 टक्के आहे. मराठा व कुणबी समाजाची संख्या ही 23.85 टक्के ओबीसी मतदारांची संख्या 31.45 टक्के इतकी, मुस्लिमांची 10.5 तर अनुसुचित जातींचे प्रमाण 9.67 तर अनुसुचित जमातींचे प्रमाण 4.17 टक्के इतकं आहे.