डबेवाल्यांना सरकारी मदत अद्यापही नाहीच, आता अपेक्षा मुंबईकरांच्या सहकार्याची…

विद्या

मुंबईचे डबेवाले हे कठोर लॉकडाऊनमध्ये हाल सहन करत आहेत. मुंबईचा अन्नदाता अशी ओळख असलेल्या डबेवाल्यांवर आता अन्नासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेला कठोर लॉकडाऊन आणि यावर्षीचे ब्रेक द चेनचे निर्बंध यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे. मुंबईतले 32 वर्षांचे अरूण शिंदे यांनी कशीबशी पुढच्या तीन-चार दिवसांसाठीच्या रेशनची तरतूद केली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबईचे डबेवाले हे कठोर लॉकडाऊनमध्ये हाल सहन करत आहेत. मुंबईचा अन्नदाता अशी ओळख असलेल्या डबेवाल्यांवर आता अन्नासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे. मागच्या वर्षी झालेला कठोर लॉकडाऊन आणि यावर्षीचे ब्रेक द चेनचे निर्बंध यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे.

मुंबईतले 32 वर्षांचे अरूण शिंदे यांनी कशीबशी पुढच्या तीन-चार दिवसांसाठीच्या रेशनची तरतूद केली आहे. ग्रांट रोड या स्टेशनजवळ असलेल्या डबावाला असोसिएशनमधून त्यांना हे रेशन मिळालं आहे. आता त्यांचे पुढचे तीन-चार दिवस बरे जातील. मला मुंबईकरांना पुन्हा एकदा डबे पोहचवायचे आहेत, त्यामुळे मला समाधान मिळेल. पण हे सगळं किती दिवस चालणार? असाही प्रश्न अरूण शिंदे यांनी विचारला.

अरूण शिंदे हे डबे पोहचवण्याचं काम करतात पण ते त्यांना नियमित पणे मिळत नाही. जेव्हा त्यांना डिलिव्हरीचे काम मिळते तेव्हा त्यांचे 50 किंवा 100 रूपये सुटतात. मात्र काही दिवस त्यांना काम मिळेल याची वाट बघावी लागते. मी माझ्या कुटुंबातील एकटा कमवता सदस्य हे. मला मिळालेलं काम हे घरातल्या प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरत नाही. आत्ताचा काळ हा अत्यंत कठीण काळ आहे, आमचं काम लवकर सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?