नाशिकच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूचं गूढ कायम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचे एका जळालेल्या कारमध्ये अवशेष आढळून आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. सुवर्णा वाजे-जाधव असं मयत वैद्यकीय अधिकारी महिलेचं नाव आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने दाखल केली होती. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांना एका जळालेल्या कारमध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. त्यांच्या मृत्यूचं गूढ मात्र अद्यापही कायम आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी हाडाचे नमुने घेतले आहेत. त्या हाडांच्या नमुन्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. तसंच कुठल्या पदार्थामुळे कारला आग लागली याची तपासणी सुरू आहे. यामध्ये अग्निशमन दल आणि परिवहन विभाग मदत करत आहे. मृतदेह पूर्णपणे जळाला असल्याने जागेवर उत्तरीय तपासणी केली होती. या सर्वांचे अहवाल आल्यानंतर पुढील तपासास दिशा मिळेल. यासाठी एक वेगळे तपास पथक नेमले गेले आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डॉ सुवर्णा वाजे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा, सासू सासरे आणि आईवडील असा परिवार आहे, एकंदर तपासावर कुटुंबीय असमाधानी आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हा तपास संथ गतीने होतो आहे. जर घटनाक्रम नीट जुळवला तर यात घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. तसंच या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी कुटुंबातील दोघांचे जबाब नोंदवले आहेत. सुवर्णा वाजे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना दिल्यानंतर कुटुंबीय मध्यरात्री त्यांचा शोध घेत होते. पण त्या कुणाकडेच कुठेही सापडल्या नाहीत.

अपघात की घातपात?

ADVERTISEMENT

डॉ सुवर्णा वाजे यांची कार महामार्गापासून अंदाजे 90 ते 100 फूट दूर लष्करी हद्दीजवळ जळालेल्या अवस्थेत आढळली. कारची एकंदर परिस्थिती, पतीची अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार आणि रात्री 11 वाजता जळत असलेल्या कारबाबत वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती मिळणे. या सर्व अनुषंगाने पोलीस सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जातो आहे.

ADVERTISEMENT

सुवर्णा वाजे या नाशिक मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सकाळी कामावर गेलेल्या सुवर्णा वाजे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान जळालेल्या अवस्थेत एक कार पोलिसांना सापडली आणि त्या जळालेल्या कारमध्येच त्यांच्या जळून खाक झालेल्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT