तरुणीच्या गळ्यावरून फिरवला चाकू; ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या आधी तरुणाने कुटुंबीयांसमोरच केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतासह जगभरात ‘व्हॅलेटाईन्स डे’ साजरा केला जात असतानाच एक वेदनादायी घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरत शहरात ही घटना घडली असून, एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून हत्या केली. तरुणाने तरुणीच्या कुटुंबियांसमोरच तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला. ही घटना काही जणांनी शूट केली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

ही घटना घडली शनिवारी (13 फेब्रुवारी). सुरत शहरातील कामरेज पोलीस ठाणे हद्दीत. लक्ष्मीधाम सोसायटीत राहणाऱ्या 21 ग्रीष्मा वेकरिया तरुणीला आजूबाजूला लोक असतानाच फेनिल गोयाणी या तरुणाने पकडलं. त्यानंतर तरुणीच्या गळ्याला चाकू लावून तिच्या कुटुंबियांना धमकावत होता. हा तरुणी तरुणीच्याच वर्गात शिकतो.

बालकावर अनैसर्गिक अत्याचार, डोळे काढले अन्…; आरोपींची कबुली ऐकून पोलिसांना फुटला घाम

हे वाचलं का?

ग्रीष्माच्या गळ्याला चाकू लावून फेनिल गोयाणी कुटुंबियांना धमकावण्याचा आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना आजुबाजूला जमलेल्या गर्दीतील लोक व्हिडीओ शूट करत होते. दरम्यान, तरुणीला वाचवण्यासाठी तिचा भाऊ ध्रुव वेकरिया आणि तिचा काका तरुणाच्या जात होते. त्याचवेळी तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केला आणि जखमी केलं.

प्रायव्हेट जेटमध्ये रोमान्स करण्याचा विचार करत होती पत्नी, वाचा पतीने काय केलं

ADVERTISEMENT

इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या गळ्यावरून चाकू फिरवत ग्रीष्माची हत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना कुणीतरी मोबाईलमध्ये शूट केली आहे.

ADVERTISEMENT

ग्रीष्माची हत्या केल्यानंतर आरोपी फेनिलने तिचा भाऊ आणि काकाचाही हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बचावले. त्यानंतर तरुणाने विष प्राशन केलं आणि हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्राईज टॅग लावून तरूणींचे फोटो शेअर केल्याचा आरोप, मुंबईच्या 22 वर्षीय तरूणाला अटक

सूरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बी.के. वनार घटनेबद्दल बोलताना म्हणाले की, ‘हत्या करणारा आरोपी फेनिल गोयाणी आणि मयत तरुणी ग्रीष्मा वेकरिया हे शाळेपासून सोबत शिकत होते. कॉलेजमध्येही दोघं एकाच वर्गात होते.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT