Zydus Cadila vaccine: मोठी बातमी… ‘या’ महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना लसीचा (Corona Vaccine) अद्यापही म्हणावा त्याप्रमाणात पुरवठा होत नाहीए. पण या सगळ्या दरम्यान एक मोठी बातमी आता समोर आली आहे. ही बातमी देशातील लस उत्पादक कंपनी झायडस कॅडिलाशी (Zydus Cadila) संबंधित आहे. याबाबत अशी माहिती मिळते आहे की, या लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि पुढील महिन्याभरात ती मुलांना दिली जाऊ शकते. असे कोव्हिड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

एन के अरोरा म्हणाले की, ‘झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. आता जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी (Vaccination children of 12-18 age group) लसीकरण सुरु केले जाऊ शकते. सध्या देशात कोरोनाची लस 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना दिली जात आहे.’

कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी केंद्र सरकारचा असा प्रयत्न आहे की, भारतातील अधिकाधिक लोकांचं लसीकरण केलं जावं. परंतु लसीकरण तेव्हाच वेग पकडू शकेल जेव्हा देशात मोठ्या संख्येने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध असतील.

हे वाचलं का?

झायडस कॅडिला लसीच्या ट्रायलचे परिणाम चांगले आल्यास त्याला लवकरच मंजुरी देखील मिळू शकते. यामुळे थोडा दिलासा मिळू शकतो.

Vaccination : १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लवकरच लस, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

ADVERTISEMENT

मंजुरीसाठी लवकरच कंपनी करू शकते अर्ज

ADVERTISEMENT

18 जून 2021 रोजी अशी बातमी समोर आली होती की, झायडस कॅडिला पुढील 7 ते 10 दिवसात ZyCoV-D ही कोरोना लस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज करू शकते. सध्या भारतात आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी मिळाली आहे. यात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-V यांचा समावेश आहे.

तिसऱ्या लाटेत कोरोनाचा अधिक परिणाम लहान मुलांवर दिसू शकतो असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अशा परिस्थितीत, जर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना झायडस कॅडिलाची कोरोना लस मिळण्यास सुरुवात झाली तर ती दिलासादायक गोष्ट ठरु शकते.

झायडस कॅडिला लसीचे दिले जाणार तीन डोस

झायडस कॅडिलाची ही लस जगातील इतर लसींपेक्षा खूप वेगळी आहे. वास्तविक, कोव्हिशिल्ड, स्पुटनिक-V,कोव्हॅक्सिन या लसींचे केवळ दोन डोस दिले जातात. परंतु झायडसच्या या लसीचे दोन नव्हे तर तीन डोस दिले जातील.

Zydus च्या कोरोनावरच्या Virafin औषधाला DCGI ची तातडीच्या वापरासाठी संमती

‘येत्या काळात दररोज 1 कोटी लसीकरण केले जाईल’

कोव्हिड वर्किंग ग्रुपचे चेअरमन एन के अरोरा यांनी तिसर्‍या लाटेबद्दल बोलत असताना असं म्हटलं आहे की, ‘आयसीएमआरने एक स्टडी केली आहे. ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की, तिसरी लाट थोडी उशिरा येईल. दरम्यान, आमच्याकडे लोकांसाठी लसीकरण करण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी आहे. येत्या काही दिवसांमध्ये दररोज एक कोटी कोरोना लसीकरण करण्याचं आमचं लक्ष्य आहे.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT