Mumbai Tak /बातम्या / Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
बातम्या राजकीयआखाडा

Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : आम्ही भेटत असतो. पण तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही गावपातळीवर एकत्रित भेटावं लागेल. जर आपण विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा विचार करत आहोत, तर आधी एक शपथ घ्यायला हवी. एकवेळ आपल्या पक्षाच्या पदरात काय पडलं नाही तरी चालेल, पण ग्रामपंचायत असो की सोसायटीची निवडणूक असो. भाजप आणि मिंधे गटासोबत युती करणार नाही, ही पहिली तयारी करा, असं आवाहन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) एकत्रित बैठकीत केलं. (Uddhav Thackeray clears his stand on alliance with bjp and eknath shinde group)

आगामी ३ महिन्यांच्या काळात महाविकास आघाडीच्या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ७ जाहीर सभा पार पडणार आहेत. या सभांचा कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला. या सभांना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि इतर नियोजन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला महत्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

मला न्यायदेवतेवर विश्वास :

यावेळी बोलताना ठाकरेंनी न्यायदेवतेवर विश्वास असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मला देवावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. मी अनेकदा म्हटलं की लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी तिघांची वाट लागलेली आहे. अशा परिस्थिती आशेचा फक्त एक किरण उरला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. तिच्या डोळ्यावरची पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्राच्या समोर जे वस्त्रहरण झालं होतं ते वेगळं. म्हणून मला खात्री आहे की न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी आपल्या देशात आता पुन्हा वस्त्रहरण होणार नाही.

Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”

ते शिवसेनेचे शिवसैनिक म्हणायच्या लायकीचे ते नाहीत :

अनेक जण मला विचारतात तुम्हाला आधी कळलं नव्हतं का? तुम्ही थांबवलं नाही का? म्हटलं कशासाठी थांबवू? विकली गेलेली माणसं आहेत त्यांच्यासोबत मी कसं लढणार? कारण ती विकली गेलेली आहे. मला विकली गेलेली माणसं नकोत, मला लढाऊ माणसं पाहिजेत. मी सगळ्यांना बोलवून सांगितलं, “दरवाजा उघडा आहे, ज्यांना थांबायचं त्यांनी थांबा, बाकीच्यांनी गेट आऊट”. माझ्याकडे विकाऊ माणसं नकोत, कारण ते शिवसेनेचे शिवसैनिक म्हणायच्या लायकीचे ते नाहीत, असा घणाघात बंडखोर ४० आमदारांवर केला.

Maharashtra Crisis : शिंदेंचं सरकार धोक्यात? सरन्यायाधीशांच्या प्रश्नांमुळे बाजी पलटणार?

तेव्हा याच माणसानं नाटक केलं होतं :

भाजपसोबत आमची युती होती, दोघे सरकारमध्ये होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही उपमुख्यमंत्रीपद ना मागितलं ना त्यांनी दिलं. जे काही आम्हाला आमच्या पदरी पडलं ते पवित्र झालं की नाही ते माहित नाही. पण काहीतरी पदरी पडलं. तेव्हा कल्याण – डोंबिवलीच्या सभेमध्ये याच माणसानं नाटक केलं होतं की, भाजप हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतो आहे हे मी उघड्या डोळांनी मी बघू शकत नाही, म्हणून डोळे मिटून तिकडे जातो असं असेल तर मला माहित नाही, असं ठाकरेंनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा