दिवाळीच्या दिवशीच गुड न्यूज! कोरोना झाल्यास घेता येणार गोळी, इंग्लंडमध्ये मिळाली मान्यता

दिवाळीच्या दिवशीच गुड न्यूज! कोरोना झाल्यास घेता येणार गोळी, इंग्लंडमध्ये मिळाली मान्यता

कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या या गोळीला इंग्लंडने सशर्त मान्यता दिली आहे

दिवाळीच्या दिवशी आपल्या देशासाठी चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या गोळीला मान्यता मिळाली आहे. ही मान्यता इंग्लंडमध्ये मिळाली असली तरीही ही चांगलीच बातमी समजली जाते आहे. हळूहळू ही गोळी जगभरात मिळू शकेल. कोरोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून भारतात सध्या लस देण्यात येते आहे.भारतातील100 कोटींहून अधिक जनतेला पहिला डोस मिळाला आहे. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, स्पुटनिक व्ही या लसी देण्यात येतात. आता इंग्लंडमध्ये कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या गोळीलाही मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे या गोळीचं वैशिष्ट्य?

ही अँटीव्हायरल गोळी आहे. molnupiravir असं या गोळीचं नाव आहे. मोल्नपायरविर असं या गोळीचं नाव आहे. या गोळीच्या सशर्त वापरला इंग्लंडने मंजुरी दिली आहे.

कोरोना रूग्ण
कोरोना रूग्ण(फोटो सौजन्य: Jaison G)

अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल

इंग्लंडचे आरोग्यमंत्री साजिद जाविद म्हणाले, 'आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतली जाते.'

अमेरीका, युरोप आणि इतर काही देशांतील संबंधित या औषधांचा आढावा घेत आहेत. अमेरीकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने गेल्या महिन्यात सांगितले की ते गोळीची सुरक्षा आणि परिणामकारकता शोधण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरीस पॅनेलची बैठक बोलावतील. औषध निर्माता कंपनी ‘मर्क’ने हे औषध विकसित केले आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंड अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते की त्यांनी या गोळीचे 4,80,000 डोस मिळवले आहेत आणि या हिवाळ्यात आणखी हजारो लोकांवर उपचार करण्यात मदत होण्याची अपेक्षा त्यांना अपेक्षा आहे.

कोरोनावर शोधण्यात आलेली ही गोळी रामबाण ठरू शकतं असंही सचिव साजिद जाविद यांनी म्हटलं आहे. ज्या रूग्णांची रोग प्रतिकारक शक्ती खालावली आहे. तसंच ज्यांना बराच अशक्तपणा आला आहे त्यांच्यासाठी ही गोळी वरदान ठरू शकते असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोव्हिडवरील पहिल्या गोळीला युकेने मान्यता दिली आहे. कोरोनाची साथ संपण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं म्हटलं जातं आहे. मोलनूपिरावीर असं या गोळीचं नाव आहे. कोव्हिडचं निदान झाल्यानंतर दिवसातून दोनदा ही गोळी देण्याचं सुचवण्यात आलं आहे. या औषधाचा वापरामुळे रूग्णालयात दाखल करण्याचा किंवा मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in