Video : 'पन्नास खोके, एकदम ओके'च्या घोषणा, अब्दुल सत्तारांनी सभागृहातून घेतला काढता पाय
Abdul Sattar Video : पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बाजार समितीचे सभापती आणि इतर पदाधिकाऱ्यांनी 'खाली डोके वर पाय' अशा घोषणांनी निषेध व्यक्त केला. मंत्री सत्तार यांनी या विरोधामुळे कार्यक्रमातून माघार घेतली.

ADVERTISEMENT

Abdul Sattar Video : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरूवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणा होताच अब्दुल सत्तार यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले होते. अब्दुल सत्तार उशिरा पोहोचल्याने एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच अब्दुल सत्तार यांनी उशिरा येऊन तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नका, असे आदेश दिल्याने अधिकच रोष निर्माण झाला. दीड तास उशिरा पोहचलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांना सभापतींच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती तसेच सचिव यांनी 'अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय', '50 खोके, एकदम ओके' अशा घोषणा दिल्या. या घोषणेनंतर अब्दुल सत्तारांनी कार्यक्रमातून घेतला काढता पाय घेतला.