बदलापूर अपप्रवृत्ती सरकारला आव्हान
बदलापूर घटनेनं 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणं सरकारला खडबडून जागं केलं. नितांत आवश्यक उपाययोजना.
ADVERTISEMENT
बदलापूर घटनेनं 2 चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणं सरकारला खडबडून जागं केलं. नितांत आवश्यक उपाययोजना.
बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जागं केलं. 2 चिमुकल्यांवर अत्याचार केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला. बदलापूर स्थानकावर नागरिकांनी रोष व्यक्त करत रेल रोको आंदोलन केलं. मोठ्या संख्येत लोक तिथं जमले आणि आरोपीला फाशी द्या अशी मागणी केली. तब्बल 12 तास लोकल सेवा बंद राहिली. या सगळ्या प्रसंगाने निर्भया प्रकरणाची आठवण झाली. कलकत्ता प्रकरण तर अगदी ताजं आहे. या सगळ्या प्रकरणात नेमकी चूक कुणाची यावर बोट ठेवता येऊ शकत नसलं तरीही तिन्ही प्रकरणांमुळे तेव्हाच्या सरकारला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं आणि सोबतच या घटनांचा काही प्रमाणात दोष दिला गेला. दिल्ली असो किंवा बदलापूर, सरकारवर अशा प्रसंगांचा परिणाम होतो. सध्या चर्चेत असलेली लाडकी बहिण योजना आणि त्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम याकडे आज कुणाचं लक्ष नव्हतं. त्यामुळे आजची घटना लाडक्या बहिणीला जड जाणार का हा प्रश्न उपस्थित होतो.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT