दोन तरुणी एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या! कोर्टात लग्न केलं, पण कुटुंबियांनी रुममध्ये असं काही केलं..सर्वांनाच बसला हादरा!
Today Shocking News Viral : समलैंगिकतेचं एक धक्कादायक प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशच्या मैनपूरी येथे ही घटना घडली आहे. येथील दोन तरुणी शिक्षण घेता घेता एकमेकींच्या प्रेमात पडल्या.

बातम्या हायलाइट

दोन तरुणींचं ऐकमेकींवर जडलं प्रेम

दोघींनी कोर्टात जाऊन केलं लग्न, पण नतंर..

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Today Shocking News Viral : समलैंगिकतेचं एक धक्कादायक प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशच्या मैनपूरी येथे ही घटना घडली आहे. येथील दोन तरुणी शिक्षण घेता घेता एकमेकींच्या प्रेमात पडल्या. इतकच नव्हे तर दोघींनी एकमेकींसोबत जीवन जगण्याचा निश्चय केला. दोघीही प्रेमात आकंठ बुडाल्या आणि कोर्ट मॅरेज केलं. कुटुंबियांना जेव्हा याबाबत कळलं, तेव्हा त्यांना दोघींना विरोध केला आणि एका तरुणीला घरात बंद केलं. जेव्हा दुसऱ्या मुलीला याबाबत समजलं, तेव्हा तिने कुटुंबियांविरोधात मोर्चा काढला. तरुणी तिच्या प्रेयसीसोबत राहण्याची जिद्द उराशी बाळगून बसली आहे. पण घरच्या लोकांनी या प्रकरणाला विरोध केला आहे. दरम्यान, दोन तरुणींचं हे प्रकरण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
करहल पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात राहणारी 21 वर्षांची तरुणी शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री केली. दोघीही एकत्र शाळेत जायच्या आणि एकमेकींसोबत वेळ घालवायच्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही दोघींबाबत काही ना काही चर्चा व्हायची. पण दोघींना एकमेकींसोबत प्रेम कधी झालं, कळलंच नाही. दोघींमध्ये जेव्हा प्रेमसंबंध घट्ट झाले तेव्हा त्यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा >> मराठा आंदोलक आक्रमक! खासदार सुप्रिया सुळेंची गाडी अडवली अन् घेराव घातला, नंतर घडलं असं काही..
याबाबत दोन्ही तरुणींच्या कुटुंबियांना कळलं, तेव्हा त्यांनी दोघींना भेटण्यावर बंदी घातली. त्यानंतर दोघींनी 26 ऑगस्ट रोजी कोर्ट मॅरेज केलं. एक शपथपत्र दिलं, ज्यामध्ये लिहिलं गेलं की, दोघीही सोबत शिक्षण घेतात आणि एकत्र राहतात. दोघीही एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
हे शपथपत्र आणि लग्नाच्या गोष्टीबाबत कुटुंबियांच्या लोकांना माहित झालं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. 2 दिवसांपूर्वी याबाबतची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसही गावात पोहोचले आणि कुटुंबियांना समजावून परत गेले. तरुणीचं म्हणणं आहे की, त्यांना पुरुषांबाबत नफरत नाहीय. पण त्या ऐकमेकींवर प्रेम करतात. त्यामुळे त्या दोघींनी लग्न केलं. दरम्यान, समलैंगिक प्रेमप्रकरणाच्या या कहाणीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.