Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे? - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे?
बातम्या राजकीय आखाडा

Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे?

What is Muslim Brotherhood : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरएसएसवर सडकून टीका केली आहे. भारतात लोकशाहीचा मार्ग पुर्णपणे बदलला आहे, यामागचे कारण आरएसएस (RSS) संघटना आहे. आरएसएस ही कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना असल्याचे सांगत त्यांनी त्याची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. दरम्यान ही मुस्लिम ब्रदरहूड (Muslim Brotherhood) संघटना नेमकी आहे तरी काय? आणि या संघटनेला अनेक देशात आतंकी संघनटना का मानले जाते? हे जाणून घेऊयात. (what is muslim brotherhood that rahul gandhi is comparing rss in london)

RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला

मुस्लिम ब्रदरहूड म्हणजे काय?

मुस्लिम ब्रदरहूड (Muslim Brotherhood) ही इजिप्तमधली सर्वांत मोठी इस्लामी संघटना आहे. या संघटनेला इख्वान अल-मुस्लमीन नावाने देखील ओळखले जाते. या संघटनेची स्थापना १९२८ साली हसन अस बन्नाने केली होती. अरब देशात या संघटनेवर आतंकवादी कारवायांना समर्थन देण्याचे आरोप होतात. तसेच अल कायदाला मुस्लिम ब्रदरहूडचा आतंकी चेहरा देखील मानले जाते. अमेरीकेतल्या 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेन ही या संघटनेचा सदस्य होता.

संघटनेचा राजकिय प्रवेश

या संघटनेने अनेक देशात इस्लामिक चळवळीवर खुप प्रभाव पाडला. तसेच मध्य पुर्वेतील देशात त्याचे अनेक सदस्य आहेत. सुरूवातीला या संघटनेचा मुळ उद्देश्य नैतिक मुल्य रूजवण्याचा आणि चांगल्या कामाचा प्रचार प्रसार करने हा होता. मात्र पुढे जाऊन ही संघटना राजकारणाकडे वळली.

संघटनेने अनेक वर्ष सत्तेवर असलेल्या राष्ट्रपती होस्नी मुबारक यांना खाली खेचण्यासाठी महत्वपुर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर जनआंदोलनामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.त्या चळवळीत मोहम्मद मुर्सी मुस्लिम ब्रदरहूडच्या (Muslim Brotherhood) विरोधाचा चेहरा बनले होते. इजिप्तमध्ये इस्लामिक ब्रदरहूड संघटनेला बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. आणि याच देशात त्यांना सर्वाधिक यश मिळालं होतं.

Maharashtra: नाना पटोले राहणार की जाणार? काँग्रेस मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मुस्लिम ब्रदरहूडचे मोहम्मद मुसी अध्यक्ष

१९५४ मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती गमाल अब्देल नासेर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडवर (Muslim Brotherhood) बंदी घालण्यात आली होती. तसेच या घटनेनंतर संघटनेचे सदस्य भूमिगत झाले होते. १९८० मध्ये या संघटनेने पुन्हा राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा दुसऱ्या पक्षासोबत युती करण्याचाही प्रयत्न केला.त्यानंतर २००० मध्ये १७ सीट जिंकून ते इजिप्तची प्रमुख विरोधी पार्टी बनले. त्यावेळी राष्ट्रपती होस्नी मुबारकने मुस्लिम ब्रदरहूड संघटनेला संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा डाव उलटला आणि त्यांना ३० वर्षानंतर २०११ साली सत्तेतून बाहेर व्हावे लागले. होस्नी मुबारक यांना हटवल्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडचे मोहम्मद मुसी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पण २०१३ मध्ये इजिप्त सैन्याने बंड करून मुर्सी यांना सत्तेवरून हटवून तूरूंगात टाकण्यात आले. त्यानंतर मुस्लिम ब्रदरहूडवर अनेक निर्बंध लादण्यात आली.

VIDEO: हनुमानाच्या प्रतिमेसमोरच ‘बिकिनी शो’, झाला प्रचंड गोंधळ

दरम्यान इजिप्तसह इतर देशात या संघटनेचा खुप मोठा प्रभाव आहे. पण बहरीन, इजिप्त, रूस,सौदी अरब आणि संयुक्त अमीरात मुस्लिम ब्रदरहूडला (Muslim Brotherhood) आतंकी संघटना मानले जाते.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!