MCA Election: शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, सर्वपक्षीय दिग्गजांमध्ये चर्चा

शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख सदस्यांची उपस्थिती
MCA Election: शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, सर्वपक्षीय दिग्गजांमध्ये चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकी संदर्भात तातडीची बैठक MCA च्या सभागृहात बोलावली.या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अमोल काळे उपस्थित आहेत. यांच्या सोबतच MCA चे २०० हून अधिक मतदार सदस्य उपस्थित आहेत. MCA ची प्रतिष्ठीत निवडणूक येत्या २० ॲाक्टोबर रोजी होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएची निवडणूक जाहीर झाल्यापासून रोज नवीन नवीन कारणांमुळे आणि राजकारणामुळे गाजत आहे... शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पॅनल, त्यात मिलिंद नार्वेकर यांचा समावेश, शिंदे गटाचे समर्थकही याच पॅनलमध्ये सहभागी त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एक वेगळीच सर्वपक्षीय महाविकास आघाडी स्थापन झाली होती.

शरद पवारांनी आशिष शेलारांना अध्यक्षपदासाठी मदत करणे यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता एका वेगळ्याच राजकारणामुळे राजकीय जीवनात एकमेकांचे विरोधक असलेले फडणवीस आणि पवार एमसीएच्या निवडणुकीत मात्र हातात हात मिळवताना दिसून येत आहेत.

२० ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक

येत्या २० ऑक्टोबरला एमसीची निवडणूक पार पडणार आहे.. त्यासाठी आशिष शेलार आणि शरद पवारांनी संयुक्त पॅनल उभं केलं. आधी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना अध्यक्षपदासाठी साथ देणाऱ्या पवारांनी ऐनवेळी संदीप पाटील यांना कात्रजचा घाट दाखवत आशिष शेलारांना अध्यक्षपदासाठी आपला भक्कम पाठिंबा दिला..

मात्र १८ ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या नवीन कार्यकारणीच्या निवडणुकीत भाजप नेते आशिष शेलार यांची खजीनदारपदावर वर्णी लागली आहे.. त्यामुळे एक व्यक्ती एक पद या उक्तीप्रमाणे आशिष शेलारांनी एमसीएच्या निवडणुकीतून माघार घेतली. आता पवार-शेलार पॅनलचा पुढचा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरू झाली..

एमसीचे उपाध्यक्ष अमोल काळे हे आता पवार शेलार पॅनलचे उमेदवार

तर सध्या एमसीएचे उपाध्यक्ष असणारे अमोल काळे हे आता पवार- शेलार पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. जे अध्यक्षपदासाठी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना लढत देतील.. अमोल काळे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात.. त्यामुळे शेलार एमसीएच्या निवडणुकीतून बाहेर पडल्यावर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचं अर्थातच अध्यक्षपदासाठी नाव समोर आलं आहे.. आणि अमोल काळेंनाही शेलारांइतकाच भक्कम पाठिंबा एमसीएच्या निवडणुकीत शरद पवारांकडून मिळणार आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in