मोदींच्या नेतृत्वामुळे प्रकल्प गुजरातला?; शिंंदेंना खडेबोल सुनावत शरद पवारांनी दिलं उत्तर

फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं पहिल्यांदाच भाष्य
NCP Chief Sharad pawar and pm narendra modi
NCP Chief Sharad pawar and pm narendra modi

फॉक्सकॉन-वेदांता संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर आणि फॅब डिस्ले निर्मिती प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र, गुजरातला गेल्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय.

पत्रकार परिषदेत शरद पवारांनी फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. तसेच केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दलही मत मांडलं.

शरद पवार म्हणाले, 'केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम काही राज्यांबाबत अनुकूल होत असतात. त्याच्यात गुजरातला लाभ मिळाला असेल, तर आपण तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी तिथे आहेत. अमित शाह तिथे आहेत. हे मोठे लोक आहेत, ज्यांच्या हातात देशाची सुत्र आहेत. त्यांनी लक्ष गुजरातकडे दिलं तर आपण समजू शकतो', असं शरद पवार म्हणाले.

NCP Chief Sharad pawar and pm narendra modi
शिंदे सरकारने भरपूर प्रयत्न केले पण गुजरातचा निर्णय आधीच झाला होता : अनिल अग्रवाल

'तुम्ही जर पंतप्रधान मोदींचे दौरे काढले, तर ते जास्तीत जास्त कोणत्या राज्यात जातात, याबद्दल दोन तीन महिन्यांचा रेकॉर्ड काढला तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची ओढ असते", असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे केंद्रामुळे प्रकल्प गुजरातला गेल्याचं म्हटलंय.

शरद पवारांनी उदय सामंत, एकनाथ शिंदेंचं शहाणपणच काढलं

उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उदय सामंत आणि एकनाथ शिंदे मंत्री होते. आणि ते आता आरोप करताहेत की मागच्या सरकारने काहीही केलेलं नाही. ज्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, त्याच मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केल्याचं ते म्हणताहेत, तर मला असं वाटतं हे काही शहाणपणाचं लक्षण नाहीये, असं म्हणत शरद पवारांनी उदय सामंत आणि एकनाथ शिदेंना खडेबोल सुनावले.

'यात महाराष्ट्राची प्रतिष्ठा नाही'; मोदींच्या आश्वासनावरून पवारांचा चिमटा

'पंतप्रधानांची भेट झाली आणि पंतप्रधान यात मदत करणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. पण हे जे सांगण्यात आलं की, एक प्रकल्प आला आहे आणि यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ. म्हणजे एखाद्या घरात लहान मुलाला कुणी फुगा दिला आणि दुसऱ्या मुलाला दिला नाही, तर पालक त्याला सांगतात त्याच्यापेक्षा मोठा फुगा तुला देतो. तसंच लहान मुलाची समजूत काढावी अशी ही समजूत काढलीये आहे. यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाहीये', असं म्हणत शरद पवारांनी यावर चर्चा न करण्याचं आवाहन केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in