Eknath Shinde : ''भाजप 288 जागा लढणार,मग महायुती कशाला?'', शिंदेंच्या खासदाराला संताप अनावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp contest 288 seats narayan rane statement eknath shinde mp naresh mhaske reaction mahayuti maharashtra politics
नारायण राणेंच्या या विधानानंतर महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या 288 जागा लढवाव्यात

point

नारायण राणेंच्या या विधानानंतर महायुतीत अंतर्गत धुसफुस

point

जागावाटपावरून शिंदेंचा खासदार संतापला

Narayan Rane Vs Naresh Mhaske : भाजप विधानसभा निवडणुकीच्या 288 जागा लढवाव्यात असे विधान भाजप खासदार नारायण राणे  (Narayan Rane) यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले होते. राणेंच्या या विधानानंतर महायुतीत अंतर्गत धुसफुस सुरु झाली आहे. इतकचं नाही तर शिंदेंच्या (Eknath Shinde) खासदाराने ''भाजप जर विधानसभेच्या 288 जागा लढणार आहे, तर मग महायुती कशाला आहे?'' असा सवाल आघाडीला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरु आहे. (bjp contest 288 seats narayan rane statement eknath shinde mp naresh mhaske reaction mahayuti maharashtra politics) 

ADVERTISEMENT

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 जागा लढवाव्यात असे विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केले होते. राणेंच्या या विधानावर एकनाथ शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडलेल आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचा नाही.हे मत माननीय अमित शहा साहेबांचा नाही आहे. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे. पण महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा : Sharad Pawar : अमित शाहांवर पवारांचा दुसरा हल्ला, म्हणाले, "तो दिवा जेलमध्ये..."

नरेश म्हस्के पुढे म्हणाले, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,  देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील. 

हे वाचलं का?

नारायण राणेंच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठिक आहे प्रत्येकाचं मत असतं, पण महायुती एकत्र निवडणूक लढवेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी विविध फॉर्म्युल्यांची चर्चा सध्या सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सर्वाधिक जागा लढेल, हे अगदी स्पष्ट आहे. तर पाठोपाठ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP : अजित पवारांना परभणीत झटका! बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT