Sharad Pawar : अमित शाहांवर पवारांचा दुसरा हल्ला, म्हणाले, "तो दिवा जेलमध्ये..."
Sharad Pawar Amit Shah : शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वर्मावर बोट ठेवत निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवार यांनी अमित शाहांवर साधला निशाणा
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाला उत्तर
भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणत शाहांनी केली होती टीका
Sharad Pawar vs Amit Shah : अमित शाह यांनी हल्ला केल्यानंतर शरद पवारांकडून शाहांना लक्ष्य केले जात आहे. अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केले होते, अशी टीका केल्यानंतर आता शरद पवारांनी दुसरा हल्ला शाहांवर केला. (Sharad Pawar criticized that Amit Shah was in jail in Maharashtra)
ADVERTISEMENT
शरद पवार हे शनिवारी (27 जुलै) छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाचा हवाला देत प्रश्न विचारण्यात आला.
विधान ऐकून शरद पवार हसले
'तुम्ही अमित शाह यांच्यावर टीका केली. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमित शाह यांच्यावर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न.'
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवारांना परभणीत झटका! बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
हा प्रश्न ऐकून शरद पवार हसले. त्यानंतर बोलताना म्हणाले की, 'तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला होता.'
शरद पवारांनी शाहांवर काय केली होती टीका?
"गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या. ते म्हणाले की, देशातील तितके भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा मी सरदार आहे. आश्चर्यच आहे. जो माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे", असा टोला शरद पवारांनी लगावला होता.
ADVERTISEMENT
संबंधित वृत्त >> शरद पवारांना अमित शाह काय म्हणालेले?
"जेव्हा ते गुजरातमध्ये होते. तिथे कायद्याचा दुरुपयोग केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गुजरातमधून तडीपार केले होते. ज्या माणसाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केले होते, आज देशाचे रक्षण करण्यासाठी गृहमंत्री म्हणून काम करतोय", असे शरद पवार म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT