BJP: 'तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे...', फडणवीसांवर टीका करताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
BJP Criticized Uddhav Thackeray: तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का? असं प्रत्युत्तर भाजपने उद्धव ठाकरेंना ट्विटरवरून दिलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंना भाजपचं प्रत्युत्तर
भाजपने केली जोरदार टीका
फडणवीसांवर टीका केल्यानंतर भाजपकडून ठाकरें निशाण्यावर
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: मुंबई: ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांच्या हत्या प्रकरणानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदते केली. ज्याला तात्काळ भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. 'उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का?' अशी टीका महाराष्ट्र भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केली आहे. (bjp responded to uddhav thackeray criticizing devendra fadnavis)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंवर भाजपची जहरी टीका
उबाठा, मा. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळी तुमचे रुसवे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतले. पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात. हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे.
उद्धव ठाकरे, तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का?
हे वाचलं का?
‘मोदी की गॅरंटी‘ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं.
गँगवॅार सरकारमध्ये नाही तर तुमच्या उबाठा गटात सुरू आहे. उबाठा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॅार सुरू केलं. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे.
ADVERTISEMENT
अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात. जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता. आपल्याच पक्षातील नेत्यांना, आमदारांना मातोश्रीवर ताटकळत ठेवत होता. या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पहिल्या आहेत. त्यामुळे शेळपट लोकांनी फुकाच्या गप्पा मारू नयेत.
ADVERTISEMENT
उबाठा बरे व्हा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा!
अशी टीका करत भाजपने देखील उद्धव ठाकरेंवरच पलटवार केला आहे. त्यामुळे आता या टीकेला शिवसेना (UBT) पक्ष कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा>> 'निर्घृण लांडग्यासारखा गृहमंत्री', ठाकरेंना संताप अनावर
उद्धव ठाकरेंच्या 'या' विधानानंतर भाजपने व्यक्त केला संताप
'ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले.. मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो.. आता माझ्याकडे शब्द नाही.. म्हणजे कलंक, फडतूस हे फारच सौम्य शब्द आहेत. पण निर्घृण असं वाटायला लागलंय की, यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? पण फडणवीस म्हणाले की, जर एखाद्या गाडीखाली कुत्र आलं.. कुत्र्याचं पिल्लू.. मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला.. पण श्वान म्हणजे फक्त संस्कृत शब्द वापरला म्हणून सुसंस्कृत होत नाही. हा सुसंस्कृत नाहीए.. हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. ज्याला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT