Uddhav Thackeray: 'निर्ढावलेला, निर्घृण.. निर्दयी आणि लांडग्यासारखा गृहमंत्री', ठाकरेंना संताप अनावर; फडणवीसांवर तुटून पडले

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका (Uddhav Thackeray)
social share
google news

Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis: मुंबई: ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान हल्ला चढवला. 'हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. जो गृहमंत्री राज्यात जनतेचं संरक्षण करू शकत.. कुत्रा तर इमानदार असतो.. पण हे गृहमंत्री लांडग्यासारखे आहेत..' अशी संतापजनक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे. (hateful heartless and wolf like home minister uddhav thackeray made such a venomous criticism on devendra fadnavis abhishek ghosalkar murder case)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर प्रचंड टीका केली. तसंच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंनी काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरेंचा संताप, फडणवीसांवर टीका करताना नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्रात गुंडांना मिळणारं संरक्षण हा चिंतेचा विषय आहे. आमचा कार्यकर्ता अभिषेकची निर्घृण हत्या झाली. ही हत्या झाली.. ज्याने ती हत्या केली तोही एक गुंड होता. त्या गुंडाने आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं वरकरणी वाटतं तेवढं सोप्पं दिसत नाही. 

समजा गुंडाने टोकाचं पाऊल उचललं असेल.. पण त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न कायम राहतो. ज्या प्रमाणे गणपत गायकवाड या भाजप आमदाराने पोलीस स्थानकात गोळीबार केल्याचा व्हिडीओ कोणीही न मागता प्रकाशित झाला.. 

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांचं फेसबुक लाईव्ह समोर आलं. गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ दिसतोय. पण कोण झाडतंय ते दिसत नाहीए. काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यावर समजलं की, मॉरिसकडे परवानाधारक शस्त्रं नव्हतं. 

पण त्याने एक बॉडीगार्ड ठेवला होता. त्याच्याच शस्त्रातून त्याने गोळ्या चालवल्या असं सांगितलं जातं. आता त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का? हा प्रश्न निर्माण होतो.

ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले.. मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो.. आता माझ्याकडे शब्द नाही.. म्हणजे कलंक, फडतूस हे फारच सौम्य शब्द आहेत. पण निर्घृण असं वाटायला लागलंय की, यांची मानसिक तपासणी करावी की काय. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का? अशी त्यांची प्रतिक्रिया होती. अतिशय संतापजनक होती.. 

हे सगळे कायद्याचे धिंडवडे निघत असताना.. जो मंत्री असतो त्यालाच जबाबदार धरलं जातं. त्या मंत्र्याकडून कारभार नीट होत नसेल तर त्यांना दूर केलं पाहिजे.

पण फडणवीस म्हणाले की, जर एखाद्या गाडीखाली कुत्र आलं.. कुत्र्याचं पिल्लू.. मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला.. पण श्वान म्हणजे फक्त संस्कृत शब्द वापरला म्हणून सुसंस्कृत होत नाही. हा सुसंस्कृत नाहीए.. हा निर्ढावलेला, निर्घृण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. 

तुम्ही गृहमंत्री म्हटल्यावर.. राज्यातील कुत्र्याचीच काय पण सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी तुमच्याकडेच येते. माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे. 

एक हत्या होत असताना तुम्ही त्याची तुलना श्वानासोबत करता आहात. तुम्ही तुमच्या शेपट्या दिल्लीश्वरांसमोर हलवताय ते वेगळं. 

उद्धव ठाकरे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख

अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांच्या 'या' विधानावर संतापले उद्धव ठाकरे...

देवेंद्र फडणवीस यांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना असं विधान केलं होतं की,  ' हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे... ही घटना तर गंभीरच आहे. पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी देखील ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. त्यामुळे या गंभीर घटनेकरिता त्यांनी राजीनामा मागितला मला काही त्यात आश्चर्य वाटत नाही. मला असं वाटतं की, या सगळ्या घटनेचं ते राजकारण करू इच्छितात. त्यांना देखील हे माहिती आहे की, ही जी काही हत्या झाली आहे ती वैयक्तिक वैमनस्यातून झाली आहे. पण ठीक आहे.. मला असं वाटतं की, ते विरोधी पक्षाचं काम करत आहेत.' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी काल (9 फेब्रुवारी) केलं होतं. ज्यावरून आता त्यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT