लातूर महापालिका निवडणूक इतिहास 2017 : महापालिकेवर भाजपचा दणदणीत विजय, 2025-26 मध्ये काय होणार?

मुंबई तक

Latur muncipal corporation : राज्यात एकूण 29 महापालिका आहेत, त्यापैकी लातूर महापालिका ही महत्त्वाची महापालिका आहे. 2012 मध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण नंतर 2017 मध्ये लातूर महापालिकेवर भाजपने विजयी मिळवला होता. अशातच 2025 मध्ये लातूर महापालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

Latur muncipal corporation
Latur muncipal corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लातूर महापालिका थोडक्यात इतिहास 

point

लातूर महापालिका निकाल 2017 माहिती

Latur Muncipal Corporation : राज्यात एकूण 29 महापालिका आहेत, त्यापैकी लातूर महापालिका ही महत्त्वाची महापालिका आहे. 2012 मध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण नंतर 2017 मध्ये लातूर महापालिकेवर भाजपने विजयी मिळवला होता. अशातच राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरून प्रचार जोरदार सुरु आहे. लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नुकतेच गेले होते. त्याच ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने रान पेटलं. त्यामुळे लातूर महापालिकेची ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.

हे ही वाचा : तरुणाच्या गुप्तांगात पेट्रोल ओतलं, नंतर त्याला इंजेक्शन दिलं... पोलीस ठाण्यात धक्कादायक कृत्य

लातूर महापालिका थोडक्यात इतिहास 

महाराष्ट्र सरकारच्या शहर विकास विभागाने लातूरला महानगरपालिकेचा दर्जा दिला आणि लातूर महानगरपालिका 25 ऑक्टोबर 2011 रोजी औपचारिकपणे स्थापन झाली. ही महापालिका शहराच्या प्रशासन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकासकामांसाठी जबाबदार आहे. 2012 मध्ये पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवले आणि स्मिता खानापुरे पहिल्या महापौर म्हणून निवडल्या गेल्या. अशातच या महापालिकेचा अंतिम निवडणूक निकाल 2017 चा इतिहास पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

लातूर महापालिकेची अंतिम निवडणूक 2017 रोजी झाली होती. ओबीसी आरक्षण आणि इतर कायदेशीर काही बाबींमुळे निवडणुका रखडल्या गेल्याचं सांगण्यात येत आहे. याच निवडणुकीत एकूण 70 वॉर्ड्स होते, आणि भाजपने बहुमताने सत्ता काबीज केली होती. त्याआधी म्हणजेच 2012 मध्ये ही सत्ता काँग्रेसकडे होते, अशातच 2025 मध्ये काँग्रेस आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा गड मानल्या गेलेल्या लातूर महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

लातूर महापालिका निकाल 2012

भाजप 00

हे वाचलं का?

    follow whatsapp