बायकोनं 'त्या' कारणावरून नवऱ्याचा दाबला प्रायव्हेट पार्ट, नंतर मुलांना टाकून गेली पळून, सासूला म्हणाली...
Crime News : पत्नीनेच आपल्याच पतीचं गुप्तांग दाबलं आणि ती घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात पतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हत्या केलेल्या पत्नीचं नाव सरिता असे आहे. तसेच पतीचं नाव राम किशन असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर हल्ला
नातवाला वडिलांना उठवायला पाठवले पण खोलीत..
Crime News : पत्नीनेच आपल्याच पतीचं गुप्तांग दाबलं आणि ती घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात पतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हत्या केलेल्या पत्नीचं नाव सरिता असे आहे. तसेच पतीचं नाव राम किशन असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान, संबंधित घटना ही हरियाणातील सेनापती येथे घडली आहे.
हे ही वाचा : लातूर महापालिका निवडणूक इतिहास 2017 : महापालिकेवर भाजपचा दणदणीत विजय, 2025-26 मध्ये काय होणार?
पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर हल्ला
घडलेल्या घटनेनुसार, पत्नी सरिता ही सोमवारी रात्री आपल्या पतीकडे 3 हजार रुपयांची मागणी करत होती. पती राम किशनने पैसे देण्यास नकार दिला आणि त्याचवरून हा वाद उफळला. मात्र, नंतर दोघांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर ते झोपी गेले. सरिताने रात्रीच्या सुमारास पतीच्या चेहऱ्यावर उशी दाबून ठेवली आणि त्याच्या गुप्तांगावर हल्ला करत तो दाबला. तिनं घरातून पळ काढताना सासूला सांगितलं 'तो आज उशिरा उठेल' नंतर तिने मोठा मुलगा कुणाल (वय 12) याला तिथेच सोडलं आणि दोघांना घेऊन ती तिथून निघून गेली होती.
नातवाला वडिलांना उठवायला पाठवले पण खोलीत..
काही वेळानंतर रुक्मिणीने नातवाला आपल्या वडिलांना उठवण्यासाठी पाठवले होते. मात्र राम किशन कसलाही प्रतिसाद दिला नाही. नंतर सासू राम किशनच्या खोलीत गेली असता, मुलगा मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
या गंभीर घटनेनंतर सरितासह सतपाल यांचं देखील एफआरआयमध्ये नमूद करण्यात आलं. पत्नीनं नेमकं असं का केलं असाव? या प्रश्नाचं उत्तर अद्यापही समोर आलं नाही. हे कृत्य महिलेनं का केलं असाव? आर्थिक कारणातून केलं की अवैध संबंधातून केलं? याचा पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.










