महिलेनं नवऱ्याच्या मदतीने प्रियकराला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कालव्यात फेकला

Crime News : प्रेमप्रकरणातून महिलेनं आपल्या नवऱ्याच्याच मदतीने प्रियकराला संपवल्याची घटना आहे. घडलेल्या घटनेनुसार, तरुणाचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध होते, परंतु वादातून त्या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींच्या मदतीने त्या तरुणाला संपवल्याची दुर्दैवी घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News (AI Photo)
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेमप्रकरणातून महिलेनं नवऱ्याच्याच मदतीने प्रियकराला संपवलं

point

कालव्यात आढळला मृतदेह 

Crime News : प्रेमप्रकरणातून महिलेनं आपल्या नवऱ्याच्याच मदतीने प्रियकराला संपवल्याची घटना आहे. घडलेल्या घटनेनुसार, तरुणाचे आरोपी महिलेसोबत प्रेमसंबंध होते, परंतु वादातून त्या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींच्या मदतीने त्या तरुणाला संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. महिलेनं त्या तरुणाला घरी बोलावून नंतर बेदम मारहाण केली, तसेच विजेच्या तारेनं गळा आवळून ठार केले. नंतर आरोपींनी मृतदेह ताब्यात घेत पोत्यात भरून बोलेरो गाडीत टाकून कालव्यात फेकून दिला. ही घटना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील आहे. 

हे ही वाचा : नांदेड: माहूर गडावर अपघात, 100 फूट खोल दरीत टेम्पो उलटून तिघांचा अंत

प्रेयसीने भाऊ आणि दोन भावांच्या मदतीने आकाशला संपवलं

पोलिसांनी बस्ती येथील रहिवासी असलेला तरुण आकाशच्या हत्येचा छडा लावला. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या प्रेयसीने भाऊ आणि दोन भावांच्या मदतीने आकाशला ठार केले. आरोपीने मृतदेह एका पोत्यात भरला आणि बोलेरा गाडीत टाकून एका कालव्यात फेकून दिला. अशातच पोलिसांनी आरोपी प्रेयसी आणि पतीला अटक केली. पोलिसांनी तपासादरम्यान तार आणि बोलेरो गाडी जप्त केली आहे. 

कालव्यात आढळला मृतदेह 

या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी मटेरा पोलीस ठाणे परिसरातील लीलापारा येथील पिपराहवा कालव्यातील एका पोत्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात तपासादरम्यान, पोलिसांनी हत्येचा प्रकार उघडकीस आणला आणि आरोपीचा पुढील शोध सुरु केला. 

हे ही वाचा : मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशी सुरु असताना दोन्ही आरोपींनी या हत्येमागे सहभागी असल्याचा कबुलीनामा दिला आहे. तपासातून पुनमच्या दोन भावांची भूमिकाही उघडकीस आली आहे. दरम्यान, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सतत छापे टाकत तपास करत आहेत. यानंतर पती पत्नीला तुरुंगात पाठवण्यात आले.